Nashik District Bank : प्रॉव्हिडंट फंड कार्यालयास सवलत मागणीचा प्रस्ताव

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ७३ सेवानिवृत्त कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडापासून वंचित असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बॅंक प्रशासनाला जाग आली आहे.
Nashik District Bank
Nashik District Bank esakal
Updated on

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ७३ सेवानिवृत्त कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडापासून वंचित असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बॅंक प्रशासनाला जाग आली आहे. याबाबत बँकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने बँकेत प्रॉव्हिडंट फंड तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरविले असून, त्यांच्याकडून प्रॉव्हिडंट फंड कार्यालयास सवलत मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे बॅंक प्रशासनाने कळविले आहे. (Nashik District Bank)

बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रॉ. फंड ट्रस्ट असून सदर ट्रस्ट १ सप्टेंबर २०२३ पासून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर ट्रस्ट २००९ ते २०१० व २०१२ ते२०१६ या कालावधीत नफ्यात होता. या कालावधीमध्ये २.४७ कोटी इतका नफा झाला होता. सदर नफ्यातून निधी उभारणी न करता या रकमेचे वाटप केले होते.

सदर ट्रस्ट २०१९ पासून तोट्यात असून, बॅंकदेखील २०१८ पासून तोट्यात आहे. त्यामुळेच ट्रस्टचा तोटा भरून देण्याची बँकेची आर्थिक परिस्थिती नसल्यानेच ट्रस्ट वर्ग करण्याबाबत भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने २०२१ मध्ये कळविले होते. ट्रस्ट वर्ग करण्याबाबतचा विषय २५ फेब्रुवारी २०२२ मध्ये बँकेच्या प्रशासक सभेवर ठेवला असता सभेने १ एप्रिल २०२२ पासून ट्रस्ट वर्ग करणे बाबत निर्णय घेतला.

२०२१-२२ मध्ये ट्रस्टचा तोटा १.६९ कोटी होता. हा तोटा १६ जून २०२३ ला बँकेने भरून दिला आहे. सदर रक्कम तत्काळ भरणा झाली असती तर पुढे तोट्याचा विषय उपस्थित झाला नसता. त्यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रस्ट १ ऑक्टोबर २०२३ पासून वर्ग करण्याचा निर्णय घेतला. प्रॉव्हिडंट फंड कायद्याप्रमाणे ट्रस्ट वर्ग करताना थर्ड पार्टीकडून ऑडिट केले असता, ट्रस्टला ३० सप्टेंबर २०२३ अखेरीला तब्बल ३.०२ कोटींचा तोटा झाला. (latest marathi news)

Nashik District Bank
Nashik News : शैक्षणिक दाखल्यांचा ‘सर्व्हर डाऊन’! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

२०१७ पासून बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. २०२१ पासून राज्य सरकारने प्रशासक नेमले आहे. बँकेस ३१ मार्च २०२४ अखेर ८५० कोटीचा तोटा असून वसुलीचे प्रमाण कमी आहे. २०१७ पासून शेतकऱ्यांनी कर्ज वसुली ठप्प आहे. तसेच याबाबत त्यांची वेळोवेळी अंदोलनेदेखील होत आहे. वसुली होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवीदेखील परत करणे शक्य होत नाही.

बँकेचे ११ लाख ठेवीदार असून त्यांच्या २०७७ कोटीच्या ठेवी आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्यादेखील ठेवी आहेत. त्यामुळे बॅंकेने प्रॉ. फंड तज्ञांचा सल्ला घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच प्रॉ. फंड कार्यालयास सवलत मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉ. फंड रक्कमेला कुठलाही धक्का लागणार नसल्याचे बॅंक प्रशासनाने कळविले आहे.

Nashik District Bank
Nashik News : मातेच्या अंतिम दर्शनासाठी ‘ऑक्सिजन’वरील पुत्राची स्मशानभूमीत धाव! निवाणेत मातृप्रेमाचे दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com