Nashik News : ‘इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब’ची जागा परत करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची ‘सीपीआरआय’ला सूचना

Nashik News : नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकणारी शिलापूर येथील इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब आता पूर्ण झाली आहे.
Court Order
Court Orderesakal
Updated on

Nashik News : नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकणारी शिलापूर येथील इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब आता पूर्ण झाली आहे. तेथे आवश्यक सर्वच मशिन्स व उपयोगी साहित्य बसविले असताना आता मुख्य रस्त्यापासून लॅबला जोडणारा ७०० ते ८०० मीटरचा रस्ताच नसल्याने अद्यापही लॅब सुरू झालेली नाही.

ही लॅब सुरू होत नसेल तर उर्वरित जागा शासनाला परत करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ‘सीपीआरआय’ला केली आहे. विशेष म्हणजे तसा प्रस्तावही केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानला (सीपीआरआय) देण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

नाशिकचे औद्योगिक क्षेत्र सातपूर व अंबड ‘एमआयडीसी’पर्यंतच मर्यादित राहिले. ग्रामीण भागात विस्तार झाला; पण शहरात राहून रोजगार मिळविणाऱ्यांची संख्या या दोनच ‘एमआयडीसीं’वर अवलंबून आहे. यात भरीव योगदान देणारी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटरवर शिलापूर येथे १०० एकर जागेवर उभी राहिली.

इलेक्ट्रिक उत्पादनांच्या तपासण्या, संशोधन आणि प्रमाणन ‘सीपीआरआय’ची ही कंपनी आहे. त्यासाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेतून ११५ कोटी रुपये मंजूर झाले. डिसेंबर २०१८ मध्ये त्याचे भूमिपूजन झाले; तर पुढील १८ महिन्यांत म्हणजे २०२० या वर्षात ही लॅब सुरू होणार होती. पण, आता २०२४ वर्षही निम्मे उलटून गेले आहे. (latest marathi news)

Court Order
Nashik News : शालाबाह्य मुलांना प्रवाहात आणा; शिक्षणाधिकारी पाटील यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन

परंतु, अद्यापही या लॅबच्या कामाला मुहूर्त लाभलेला नाही. आता तर लॅब सुरू होणे शक्य नसेल तर लागलीच शिल्लक जागा परत करावी, विविध प्रयोजनांसाठी सातत्याने जागेची मागणी होत असल्याने उद्योजकांना देण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे या लॅबच्या १०० एकर जागेपैकी काही क्षेत्र कमी होण्याची शक्यता वाढली आहे.

का काम अडले?

इलेक्ट्रिकल लॅबचे काम पूर्ण झाले असून, टेस्टिंग इक्वीपमेंटही बसले आहे. पहिल्या टप्प्यात एनर्जी मीटर्स, ट्रान्स्फार्मर्स, ऑईल इन्सुलेशन्स यांसारख्या चाचण्या करता येतील. ही सर्व व्यवस्था सहा महिन्यांपूर्वीच झाली आहे. टेस्टिंग लॅबला जोडणारा रस्ताच अद्याप पूर्ण झालेला नाही. आडगाव-सय्यद पिंप्री या मुख्य रस्त्यापासून ते टेस्टिंग लॅब या दरम्यान ७०० ते ८०० मीटरचा रस्ताच झालेला नाही.

Court Order
Nashik Monsoon News : पावसाच्या माहेरघरी मॉन्सूनची प्रतीक्षा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.