कोरोनाचा जिल्ह्यात कहर सुरूच! आज पाच हजार ६७ पॉझिटिव्‍ह

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या चाळीस हजारांच्‍या उंबरठ्यावर
corona updates
corona updates
Updated on

नाशिक : जिल्ह्यात एकीकडे नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्यादेखील वाढते आहे. गुरुवारी (ता.१५) दिवसभरात पाच हजार ६७ पॉझिटिव्‍ह आढळले असून, उपचार घेणाऱ्या ३५ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरुच असल्‍याची स्‍थिती सध्या आहे. उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या चाळीस हजारांच्‍या उंबरठ्यावर असून, सध्या ३८ हजार ५८० बाधितांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात दोन हजार ९३५, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार ९९८, मालेगावचे ८८, तर जिल्‍हा बाहेरील ४६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. ३५ मृतांपैकी नाशिक शहरातील १९ तर नाशिक ग्रामीणमधील सोळा बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी नाशिक शहरातील रामनगर येथील ३५ वर्षीय व त्रिमुर्ती चौकातील २८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमधील मृतांमध्ये नाशिक व येवला तालुक्‍यातील चार, निफाड तालुक्‍यातील तीन, इगतपुरी, मालेगाव ग्रामीण, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी तालुक्‍यातील मृतांचा समावेश आहे.

corona updates
अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन लाख ४८ हजार ८६८ कोरोना बाधित आढळून आले असून, यापैकी दोन लाख ७ हजार ४७२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे तब्‍बल दोन हजार ८१६ बाधितांना मृत्‍यू झाला आहे.

प्रलंबित अहवाल, संशयितांची संख्या अद्यापही वाढतीच

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्ह्यातील सात हजार ६४७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक चार हजार १६२ अहवाल नाशिक ग्रामीणचे, तर दोन हजार ९०९ अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. मालेगावच्‍या ५७६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दुसरीकडे जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार ९५५ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील पाच हजार ५६१ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात अकरा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २४ रुग्‍ण दाखल झाले आहेत.

corona updates
पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()