नाशिक : राज्यातील विदर्भ वगळता इतर भागामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार (ता. १३)पासून सुरू होत असून, प्रत्यक्ष वर्ग बुधवार (ता. १५)पासून भरतील. विदर्भामध्ये २७ जूनपासून तयारी सुरू होऊन २९ जूनपासून विद्यार्थी दाखल होतील. काही भागात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत आहे. याअनुषंगाने १२ ते १४ वर्षे वयोगटांतील पहिल्या डोसचे ८५.९३ टक्के लसीकरण पूर्ण करत नाशिक जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान मिळवले आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटांच्या पहिला डोस लसीकरणात जिल्हा १२ व्या स्थानावर आहे. शाळा सुरू होत असताना पालकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मुलांच्या १२ ते १४ वर्षे वयोगटांतील पहिल्या डोसचे राज्यात ५७.१३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात सर्वांत कमी २८.२४ टक्के लसीकरण मुंबईचे झाले आहे. राज्याच्या लसीकरणाच्या तुलनेत कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड (३६.७६ टक्के), अकोला (३९.९३ टक्के), नागपूर (४१.९५ टक्के), ठाणे (४२.७० टक्के), नंदुरबार (४३.२२ टक्के), परभणी (४३.५७ टक्के), बुलडाणा (४६.३८ टक्के), यवतमाळ (४७.७८ टक्के), जळगाव (४८.९६ टक्के), अमरावती (५०.९० टक्के), गडचिरोली (५१.२८ टक्के), पालघर (५१.४८ टक्के), पुणे (५१.१९ टक्के), धुळे (५३.३१ टक्के), हिंगोली (५५.५६ टक्के), औरंगाबाद (५६.९० टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय १५ ते १८ वर्षे वयोगटांतील लसीकरणाच्या पहिला डोस नाशिक जिल्ह्यात ६९.९१ टक्के मुलांना देण्यात आला आहे. या वयोगटातील राज्यातील ६४.७६ टक्के मुलांचे पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे. सर्वाधिक भंडारा जिल्ह्यातील ८२.२६ टक्के, तर सर्वांत कमी ४८.९२ टक्के अकोला जिल्ह्यातील मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. मुंबईतील लसीकरणाचे प्रमाण ५७.१२, तर पुण्यातील ६६.९४ टक्के इतके आहे.
नाशिक जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
- १२ ते १४ वर्षे वयोगट : मुले- दोन लाख २१ हजार १८२, पहिला डोस ः ८५.९३ टक्के, दुसरा डोस - ५३.६७ टक्के
- १५ ते १७ वर्षे वयोगट : मुले- तीन लाख ४३ हजार २०५, पहिला डोस - ६९.८० टक्के, दुसरा डोस - ५५.४१ टक्के
- १८ वर्षांवरील लोकसंख्या : ५१ लाख ७५ हजार ८८९, पहिला डोस - ९०.४८ टक्के, दुसरा डोस -७७.६३ टक्के
- प्रतिबंधात्मक डोस दिलेल्यांची संख्या : एक लाख ४६ हजार ५४५
देशातील कोरोनाविषयक सद्यःस्थिती
रुग्णविषयक माहिती रविवार (ता. १२) शनिवार (ता. ११)
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण ४४ हजार ५१३ ४० हजार ३७०
सक्रिय रुग्णसंख्या ०.१० टक्के ०.०९ टक्के
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर ९८.६८ टक्के ९८.६९ टक्के
२४ तासांत नव्या रुग्णांची संख्या आठ हजार ५८२ आठ हजार ३२९
दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर २.७१ टक्के २.४१ टक्के
२४ तासांतील चाचण्यांची संख्या तीन लाख १६ हजार १७९ तीन लाख ४४ हजार ९९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.