Nashik News : नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात प्रथम! 2 वर्षांत 1434 नवउद्योजकांना कर्ज मंजूर

Latest Nashik News : यात रक्कम चार हजार ८० लक्ष एवढे अनुदान वाटप केले. त्यात सात हजार १७० एवढा रोजगार निर्माण झालेला आहे. अनुदान वाटपात नाशिक जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली.
Fund
Fund esakal
Updated on

सातपूर : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील नवउद्योजकांना भरीव अशा अनुदानाच्या स्वरूपात उद्योग उभारणीत हातभार लावला जात आहे. या योजनेत मागील दोन वर्षांत नाशिक जिल्ह्यात एकूण एक हजार ४३४ नवउद्योजकांना कर्ज मंजूर करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

यात रक्कम चार हजार ८० लक्ष एवढे अनुदान वाटप केले. त्यात सात हजार १७० एवढा रोजगार निर्माण झालेला आहे. अनुदान वाटपात नाशिक जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली. (District Industry Center first in state in grant allocation)

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता उद्योग विभागातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे १२ मार्चला आयोजन करण्यात आले होते. त्यात गुंतवणूकदार व शासनातर्फे सामंजस्य करार करण्यात येऊन उद्योगांना शासनातर्फे सोयी-सुविधा पुरविण्याबाबत प्राधान्य देण्यात येणार आहे.

त्यात नाशिक जिल्ह्यात १६९ उद्योग घटकांकडून १२३५.०८ कोटी एवढी गुंतवणूक होईल. १९ हजार ४२५ एवढा रोजगार निर्माण होणार आहे. नाशिक जिल्ह्यात गुंतवणुकीचा ओघ अजूनही सुरू असून, त्या सर्वांबरोबर सामंजस्य करार केले. उद्योगांना सोयी-सुविधा व आवश्यक ते परवाने देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. (latest marathi news)

Fund
Kiren Rijiju : संविधान प्रत्येक भारतीयाचा आत्मा : केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू

त्यामुळे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. नाशिक जिल्ह्यात उद्योगांना आवश्यक त्या परवानग्या एकाच छताखाली प्राप्त होण्यासाठी शासनाने यापूर्वी ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग भवन उभारलेले आहेच. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेवरही लवकरच नवीन उद्योग भवनाचे काम सुरू होईल. याचा मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे.

Fund
Nashik : देवळालीसह भुसावळ, श्रीरामपूरवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा! विधानसभेच्या 8 ते 9 जागांची रिपाइंसाठी मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.