किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : दीडशे वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला २६ जुलै २०२४ ला १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा, द्राक्ष, वाईन आणि कांद्याची बाजारपेठ म्हणून लौकिक मिळविलेल्या नाशिकच्या निर्मितीला एवढी वर्षे होत असताना या गौरवशाली क्षणांचा जिल्हा प्रशासनाला अक्षरश: विसर पडला आहे. यानिमित्त कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन नाही की जिल्हाधिकारी कार्यालयावर साधी रोषणाईही केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. (Nashik district is completing 155 years)
स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई प्रांतात झालेल्या बैठकीनुसार १० जुलै १८७९ ला भडोच, कुलाबा, सोलापूरबरोबरच नाशिक हे स्वतंत्र कलेक्टोरेट म्हणजे जिल्हा झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, नाशिक कलेक्टोरेट हे न्यायालयीन कक्षा ठाणे याच्याशी संलग्न ठेवण्यात आले होते. याच नोटिफिकेशननुसार अकोला तालुका हा न्यायालयीन कामासाठी सिन्नरला जोडल्याचे व सिन्नर हे ठाणे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सी. आर. ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते. २६ जुलै १८६९ च्या शासन आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोरी, निफाड, येवला आणि अकोला असे आठ उपविभाग, तर खानदेश जिल्ह्याचे नांदगाव, मालेगाव आणि बागलाण असे तीन उपविभाग करण्यात आले. (latest marathi news)
त्याचवेळी नाशिकला पूर्णत: विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. अल्पावधीत अकोला तालुका अहमदनगरमध्ये समाविष्ट करण्यात आला. १८७५ मध्ये बागलाण विभागातून कळवण स्वतंत्र झाला आणि बागलाण व कळवण असे दोन तालुके अस्तित्वात आले. पेठ राज्य ब्रिटिश अधिपत्य प्रदेश झाले आणि १८७८ मध्ये त्याचे एका उपविभागात रूपांतर करण्यात आले.
जिल्ह्याच्या प्रशासनाची सूत्रे सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना कलेक्टर हे पदनाम देण्यात आले. सध्या ज्या दिमाखदार वास्तूत जिल्हा प्रशासनाचा गाडा हाकला जातो, त्यात आजवर १०५ जिल्हाधिकारी लाभले. सध्या जलज शर्मा यांच्याकडे जिल्ह्याचा कारभार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.