Nashik News : तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. फेब्रुवारी २०२३ पासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. यानंतर दीड वर्ष अखंडपणे टँकर सुरू राहिल्याने त्यावर ९० कोटींचा खर्चही झाला. जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तब्बल २० टक्के लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा झाला. येवला, नांदगाव, सिन्नर तालुक्यांचा टंचाईचा सर्वाधिक खर्च झाला. (district is tanker free after one year due to heavy monsoon )