नाशिक : सणासुदीच्या पार्श्वभुमिवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना पत्र पाठवत कोरोना प्रादुर्भावाबाबत सावध केलेले आहे.
लसीकरणावर भर देण्याचेही आवाहन केले आहे. परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार करता बुस्टर डोसबाबत उदासिनतेचे दर्शन घडत असून, पहिल्या डोस घेतलेल्या ५१ लाख ४४ हजार ९६९ जिल्हावासीयांपैकी अवघ्या तीन लाख ९० हजार ६३९ जणांनी बुस्टर डोस घेतला असून हे प्रमाण ७.५९ टक्के आहे. दुसरा डोस घेणार्या नागरीकांनी संख्या ४५ लाख ४६ हजार ०९६ असून, अद्यापही १२ टक्के नागरीक दुसर्या डोसपासून दुर आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या महिन्यात नव्याने आढळणार्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या सरासरी शंभरच्या सुमारास राहिली. तर काही बाधितांना कोरोनाने बळीदेखील घेतला.
सध्याच्या स्थितीत कोरोनाची लागण झालेली सक्रिय रुग्ण संख्या पाचशेच्या सुमारास आहे. असे असतांनाही नागरीकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत उदासिनता बघायला मिळते आहे. विशेषतः बुस्टर डोस घेणार्या जिल्हावासीयांची टक्केवारी एक आकडी असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढीच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेसह सामान्यांचीही चिंता वाढणार आहे.
आरोग्य, सरकारी कर्मचार्यांमध्ये लसीकरणाबाबत उदासिनताच
सर्वसामान्यांसोबत आरोग्य क्षेत्रातील व अन्य शासकीय कर्मचार्यांमध्येही लसीकरणाबाबत तितका उत्साह नसल्याचे चित्र आहे. या क्षेत्रातील १ लाख ९३ हजार ९३६ व्यक्तींनी कोरोनाचा पहिला डोस घेतला असून, यापैकी एक लाख ८३ हजार ३५७ व्यक्तींनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. अवघ्या ८० हजार ४४० कर्मचार्यांनी बुस्टर डोस घेतलेला आहे.
वयोगटनिहाय लसीकरणाचे जिल्ह्यातील प्रमाण असे-
(काल, ६ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी)
लसीकरणाचा प्रकार ६० वर्षे व पुढे ४५-६० १८-४४ १५-१७
पहिला डोस ६,६९,९५१ ९,७६,१७६ २८,५१,७५८ २,०५,०४०
दुसरा डोस ६,२३,१६३ ८,९८,३०० २४,७७,३३२ २,४५,१९३
बुस्टर डोस १,२४,८२४ ७४,७६३ १,१०,६१२ --
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.