नाशिक : मागील वर्षभरापासून रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत पदोन्नती झालेल्या हर्षदा बडगुजर यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून बदली झाली आहे. श्रीमती बडगुजर यांनी प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्याकडून पदभार घेत कामाला सुरुवात केली. तत्कालीन जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांची १७ ऑक्टोबर २०२३ ला नाशिक जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारीपदावर बदली झाली होती. (District Social Welfare Officer Harshada Badgujar accepted directions )