PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्हा राज्यात तृतीय

PM Awas Yojana
PM Awas Yojanaesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी असलेली प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात गोंदिया पहिल्या, अहमदनगर दुसऱ्या, तर नाशिक जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. नाशिक जिल्ह्याला २०१६ ते २०२२ या कालावधीत ८९ हजार ६९५ उद्दिष्ट्ये देण्यात आली होती.

त्यापैकी आतापर्यंत ७५ हजार ४५ घरकुले (८४ टक्के काम) पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय विचार करता नाशिक तालुका घरकुले बांधण्यात आघाडीवर असून, मालेगाव तालुका पिछाडीवर आहे. (Nashik district third in state in Pradhan Mantri Awas Yojana nashik news)

देशभरात २०१६-१७ पासून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे. यात घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात १.२० लाख व नक्षलग्रस्त भागाकरिता १.३० लाख प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य दिले जाते.

सदर अर्थसहाय्य राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा केले जाते. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, २०११ मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येते.

योजनेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठित करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण गठित केली असून, त्यामार्फत नियंत्रण ठेवले जाते.

ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्याला दर वर्षी घरकुलांचे उद्दिष्ट्ये निश्चित करून दिले जाते. या यंत्रणेच्या मार्फत निश्चित झालेल्या लाभार्थ्यांकडून घरकुले बांधून निधी वर्ग केला जातो.

PM Awas Yojana
NMC News : गाळ्यांच्या भाडे दरात व्यावसायिकांना 15 टक्के दिलासा

गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

२०२२ अखेर प्रधानमंत्री आवास योजनेचा राज्याचा आढावा झाला असता, यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याला ९६ हजार ४९८ उद्दिष्ट्ये दिले होते. यापैकी आतापर्यंत ८६ हजार ८०९ (८९.९६ टक्के) काम पूर्ण झालेले आहे.

अहमदनगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यास ६० हजार ७९६ उद्दिष्ट्ये दिले होते. यातील ५० हजार ९५९ घरकुले (८३.८२ टक्के काम) पूर्ण झाली आहेत. नाशिक जिल्ह्याने ८४ टक्के काम पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकविला आहे.

जिल्ह्याने ८९ हजार ७१० प्रस्ताव केले होते. यापैकी ८९ हजार ६९५ उद्दिष्ट्ये निश्‍चित करण्यात आली होती. यातील ७५ हजार ४५ घरकुले पूर्ण झाली असून, १४ हजार ६५० घरकुले अपूर्ण आहेत. जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक दोन हजार ३८७ घरकुले अपूर्ण आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

PM Awas Yojana
Nashik News : सुरतला निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची अडवणूक

तालुकानिहाय उद्दिष्ट्ये व पूर्ण झालेली घरकुले

तालुका उद्दिष्ट्ये पूर्ण झालेली घरकुले अपूर्ण घरकुले

मालेगाव १३ हजार ०५१ दहा हजार ६६४ दोन हजार ३८७

बागलाण दहा हजार १५३ आठ हजार ७३७ एक हजार ४१६

येवला चार हजार ५४९ तीन हजार ३३० एक हजार २१९

कळवण आठ हजार ८३२ सात हजार ६२६ एक हजार २०६

नांदगाव पाच हजार ८५३ चार हजार ६७६ एक हजार १७७

दिंडोरी सात हजार ७११ सहा हजार ६१६ एक हजार ९५

इगतपुरी चार हजार २४६ तीन हजार १५१ एक हजार ९५

सुरगाणा आठ हजार ९६७ सात हजार ९५० एक हजार १७

चांदवड तीन हजार १७९ दोन हजार ३६० ८१९

त्र्यंबकेश्वर सहा हजार ६५९ पाच हजार ८६५ ७९४

निफाड तीन हजार ४० दोन हजार ४०३ ६३७

सिन्नर तीन हजार ८६६ तीन हजार २५८ ६०८

पेठ सहा हजार ७१ पाच हजार ४९५ ५७६

देवळा दोन हजार ३४१ एक हजार ९९५ ३४६

नाशिक एक हजार १७७ ९१९ २५८

वर्षानिहाय अपूर्ण असलेली घरकुले

२०१६-१७ (१९८)

२०१७-१८ (१०८)

२०१८-१९ (१०४)

२०१९-२० (एक हजार ९१५)

२०२०-२१ (दोन हजार १३८)

२०२१-२२ (दहा हजार १८७)

PM Awas Yojana
Bhairavnath Maharaj Yatra : ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सिन्नरकर सज्ज!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.