Satyajit Tambe News: भरला बुवा एकदाचा अर्ज... नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणुकीत ट्विस्ट

Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituency
Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituencyesakal
Updated on

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी माघार घेऊन मुलगा सत्यजित तांबे याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अर्ज माघारीच्या दिवशी काय होणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, पाचही जिल्ह्यांतून २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, शेवटच्या दिवशी २० अर्ज आले.

एकूण ३१ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल झाले असून, काहींनी दोनदा अर्ज भरले आहेत. (Nashik Division Graduate Constituency Election independent application of Satyajeet Tambe Nashik News )

Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituency
Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

अर्ज दाखल करण्याची आज अखेरची मुदत होती. यात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

सुधीर तांबे यांच्याकडे काँग्रेसचा एबी फॉर्म असूनही त्यांनी पक्षातर्फे अर्ज भरला नाही. दरम्यान, अपक्ष अर्ज भरला असला तरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे.

वेळेवर काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.

माघारीपर्यंत काय काय होणार?

काँग्रेसकडून नाशिकच्या जागेसाठी गुरुवारी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे एबी फॉर्म त्यांच्या नावाने होता.

ऐनवेळी यात बदल झाला, डॉ. तांबे यांनी माघार घेतल्याने आणि वेळेत एबी फॉर्म न आल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत काय घडामोडी घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसते.

मात्र पुरस्कृत उमेदवाराला कोणताही पक्ष पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे पुढे काय होणार, यासंदर्भात मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituency
Nashik News : महा-ई-सेवा केंद्राचा परवाना वर्षासाठी रद्द

हे आहेत उमेदवार

शुभांगी भास्कर पाटील, जुबेर शेख, सोमनाथ नाना गायकवाड, सुरेश भीमराव पवार, असाटी रहीस अहमद, सुभाष निवृत्ती चिंधे, रतन कचरू बनसोडे, ईश्वर उखा पाटील, सुभाष राजाराम जंगले, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे, धनराज देवीदास विसपुते, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, छगन भिकाजी पानसरे, धनंजय कृष्णा जाधव, अनिल शांताराम तेजा, नितीन नारायण सरोदे, संजय एकनाथ माळी, दादासाहेब हिरामण पवार, राजेंद्र दौलत निकम, भागवत धोंडिबा गायकवाड, रतन कचरू बनसोडे, पोपट सीताराम बनकर, बाळासाहेब घोरपडे ,अविनाश माळी, इरफान मोहम्मद इसाक, सुनील शिवाजी उदमले, सुभाष राजाराम जंगले, अमोल बाबासाहेब खाडे, सत्यजित सुधीर तांबे, शरद मंगा तायडे. (यातील काहींनी दोनदा अर्ज भरले आहेत.)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituency
Nashik News : महा-ई-सेवा केंद्राचा परवाना वर्षासाठी रद्द

काँग्रेस-भाजपमध्ये समझोता एक्स्प्रेस?

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अधिकृत एबी फॉर्म दिलेला असताना विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजितला चाल दिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे अमरावतीच्या बदल्यात भाजपने तांबे कुटुंबीयांना चाल दिल्याचे बोलले जात आहे.

सत्यजित यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठीही दबाव होता. मात्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देता येणार नाही, तसे केल्यास जिल्ह्यासह संपूर्ण कुटुंबीयांच्या राजकारणावर परिणाम होईल, तसेच मामा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही राजकारणावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाल्याने अपक्ष अर्ज दाखल केल्याची उघडपणे चर्चा सुरू झाली आहे.

पडद्यामागे नेमके काय राजकारण शिजले की आणखी काही, याचे उत्तर माघारीपर्यंत समजेल. ही निवडणूक चिन्हावर नसते, मात्र पुरस्कृत असते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होणार, याकडे पाचही जिल्ह्यांमधील मतदारांचे लक्ष लागले आहे.

५४ तालुके आणि नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक उमेदवारांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली होती, त्यात धनराज विसपुते, राजेंद्र विखे यांचाही समावेश होता.

मात्र भाजपने अधिकृत एबी फॉर्म कुणालाच दिला नाही. त्यामुळे भाजपची चालही सावध असल्याचे बोलले जात आहे. एकूणच ही निवडणूक म्हणजे समझोता एक्स्प्रेस तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Satyajit Tambe after filing his candidature for the five-year election of Nashik Graduate Constituency
Nashik News | ज्ञानदीपमधील अत्याचार प्रकरणी आयोगाला स्वतंत्र अहवाल देणार : सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.