Income Tax Department : शासकीय अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीतून छापे

Nashik News : प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात जवळपास ९० कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आले आहे.
Income Tax Department
Income Tax Department esakal
Updated on

Nashik News : प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात जवळपास ९० कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आले आहे. यापूर्वीही नाशिकमध्ये छापे पडले. यातून राजकीय कनेक्शनबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीतून छापे पडल्याचे बोलले जात आहे. (Division on Agenda of Income Tax Department)

गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या या धाडसत्रातून प्राप्तिकर विभागाच्या अजेंड्यावर नाशिक असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुकांपर्यंत नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या कारवाया अधिक वाढणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक, जळगाव व नागपूर येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २४) शहरातील काही सराफ व्यावसायिकांवर छापा टाकला.

मनमाड व नाशिकमधील सराफ व्यावसायिकांच्या दालनांसह त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यात २६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एकूण ९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली. गेल्या काही वर्षांत नाशिकमधून प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले. (latest marathi news)

Income Tax Department
Nashik Tejas Garge Bribe Case : डॉ. तेजस गर्गेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; 12 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

मागील वर्षभरापासून नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या डाळींचे सत्र वाढले आहे. एका प्रथितयश बांधकाम व्यवसायिकाच्या घर व कार्यालयावर छापे टाकण्यात आले. यातून काही राजकीय संबंध उघड झाले. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या डायरीत सांकेतिक भाषेतील नावे आढळून आली होती.

त्यातून काही सरकारी अधिकाऱ्यांची नावे समोर आली; परंतु त्याचा तपशील बाहेर आला नाही. नियमानुसार सरकारी कर भरल्यावर प्रकरण मिटले. त्यानंतर पुन्हा काही बांधकाम व्यावसायिकांवर छापे पडले. त्यातूनही राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांचे कनेक्शन उघड झाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी छापे टाकण्याची कारवाई झाल्याने राजकीय कनेक्शनची चर्चा होती. जवळपास १२ ठिकाणी आतापर्यंत प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याने यातून छापे पडत असल्याचे बोलले जाते.

Income Tax Department
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.