Nashik News : मत्स्यबीज उत्पादनात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर!

Nashik News : नाशिक विभागात मत्स्यशेती कल्याणकारी योजना पोहोचविण्यात नाशिक विभाग सध्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करीत आहे.
fish seed production (file photo)
fish seed production (file photo)esakal
Updated on

Nashik News : नाशिक विभागात मत्स्यशेती कल्याणकारी योजना पोहोचविण्यात नाशिक विभाग सध्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करीत आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्यात नाशिक विभाग मत्स्यबीज उत्पादनात द्वितीय स्थानावर आहे. आरोग्याला कॅल्शियम मिळण्यासाठी मासा हा घटक आहारात अतिशय महत्त्वाचा आहे. (Nashik division ranks second in fish seed production)

माशांच्या निर्मितीपासून तर थेट बाजारात विक्री करण्याकरिता व लोकांना चवीचवीने खाऊ घालण्यासाठी राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना सध्या शेतकरी व बेरोजगारांना दिल्या जात आहेत. मत्स्यशेती वाढावी आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा, निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, हा यामागचा उद्देश आहे.

नाशिक विभागात आजपर्यंत सामूहिकरीत्या स्थापन झालेल्या सोसायटी बचत गट अथवा फिश फार्मर प्रोड्यूसर कंपनीला कोट्यवधींचे अनुदान दिले गेले आहे. यातून विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव.

नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांमधील मत्स्यशेती बहराला आली आहे. अनेक बंद पडलेली मत्स्यबीज केंद्रे गेल्या दोन वर्षांत सुरू केली गेली. तसेच, खासगी मत्स्यबीज केंद्रे उभारणीस प्रोत्साहन दिले. परिणामी, मत्स्यबीज उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. (latest marathi news)

fish seed production (file photo)
Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

का साजरा होतो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस?

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा सबंध देश उपासमारीच्या समस्येशी दोन हात करीत होता, मोठ्या प्रमाणात दुष्काळ व उपासमारीची समस्या उद्‍भवली होती, त्याच वेळी भारतात मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळाली. याचवेळी मत्स्यबीज निर्मितीचा विस्तार झाला व मत्स्यबीज निर्मितीच्या संकल्पनेला विस्तार देण्याचे क्रांतिकारी कार्य महान मत्स्यवैज्ञानिक डॉ. हिरालाल चौधरी यांनी केले. त्यांना समर्पित करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस साजरा केला जातो.

"शासनाने आम्हाला समूहाने काम दिल्याने आम्ही समूहाने मत्स्यशेती करीत आहोत. मासेमारीसाठी लागणारी अवजारे व साधनसामग्री आम्हाला शासनाने उपलब्ध करून दिल्याने हा व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. माशांच्या निर्मितीपासून तर थेट बाजारापर्यंत नेण्याची साखळी आम्ही शासनाने दिलेल्या कल्याणकारी योजनांमुळेच अमलात आणू शकलो. मत्स्यशेतीकडे रोजगार म्हणून बेरोजगारांनी पाहायला हवे." - ज्ञानदेव पवार, अध्यक्ष, चणकेश्वर आदिवासी मच्छीमार संस्था, चणकापूर (ता. कळवण)

"नाशिक विभागात आम्ही मत्स्यशेतीच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत घेऊन जात आहोत. यासाठी सोसायटी स्थापन करण्यापासून तर प्रस्ताव कसा तयार करावा, अनुदान मिळण्यासाठीची प्रक्रिया आणि पात्रता या सर्व गोष्टी आम्ही लाभार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन देत असतो. अनेक लोक नाशिक येथे विभागीय कार्यालय आणि जिल्हा कार्यालयात येऊन मार्गदर्शन घेतात. यातून समूह रोजगार निर्मिती होऊन मत्स्यशेतीला चालना मिळत आहे." - प्रणिता चांदे, सहाय्यक आयुक्त, मत्स्य

fish seed production (file photo)
Nashik News : खळबळजनक! प्रेमसंबंधातून महिलेने घेतली मनगटाची नस कापून; सातपूर पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

"मत्स्यशेतीला मारक असणारा मागूर माशावर आतापर्यंत विभागात ११ ठिकाणी कार्यवाही झाली. ३३ टन प्रतिबंधित मांगूर नष्ट करण्यात आला. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून ५८६ प्रकल्प विभागात मंजूर झाले असून, इगतपुरी तालुक्यात गरजू शेतकऱ्यांना मासे विक्री साहित्य आम्ही वाटप केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही भेट देऊन योजना सांगतो." - संजय वाटेगावकर, उपायुक्त, मत्स्य, नाशिक विभाग

मत्स्यबीज उत्पादन

• मत्स्यचिज स्वरूपातील उत्पादन (लक्ष)

सन

२०२१-२२ = ४१.३३

२०२२-२३ = २०५३.९

२०२३-२४ = ३२११.३१

* मत्स्योत्पादन (टन मध्ये)

सन २०२३-२४ ः १६११२. ८१

fish seed production (file photo)
Nashik Monsoon Delay : मालेगाव तालुक्यात पावसाची प्रतिक्षा; पावसाअभावी 24 टक्के पेरण्या खोळंबल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.