SSC Exam Result : नाशिक विभागात 95.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; गेल्या वर्षीपेक्षा साडेतीन टक्‍के वाढ

Nashik News : नाशिक विभागात प्रविष्ट झालेल्‍या एक लाख ९५ हजार ५८२ विद्यार्थ्यांपैकी एक लाख ८६ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
SSC Exam Result
SSC Exam Resultesakal
Updated on

Nashik News : बहुप्रतीक्षित इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी (ता. २७) दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. नाशिक विभागात प्रविष्ट झालेल्‍या एक लाख ९५ हजार ५८२ विद्यार्थ्यांपैकी एक लाख ८६ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्‍केवारी ९५.२८ इतकी आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत निकाल साडेतीन टक्क्‍यांनी वधारला आहे. (SSC Exam Result 95 percent students passed in Nashik division)

विभागात सर्वाधिक ९५.७९ टक्‍के निकाल नाशिक जिल्ह्याचा आहे. दरम्‍यान, निकालात राज्‍यातील नऊ विभागांमध्ये नाशिक सहाव्‍या स्‍थानी आहे. गेल् ‍यावर्षी मार्च २०२३ मध्ये नाशिक विभागाचा निकाल ९१.८० टक्‍के लागला होता. त्‍यात यावर्षी सुमारे तीन टक्क्‍यांनी वाढ झाली आहे. त्‍याआधी मार्च २०२२ मध्ये निकाल ९५.९० टक्‍के लागला होता. त्‍यामुळे यंदाचा निकाल समाधानकारक मानला जातो.

असे असले तरी राज्‍यस्‍तरावर इतर विभागांशी तुलना केल्‍यास उत्तीर्णांच्‍या टक्‍केवारीनुसार नाशिक विभागाचा नऊ विभागांमध्ये सहावा क्रमांक लागला आहे. सोमवारी दुपारी एकला निकाल जाहीर झाल्‍यावर संकेतस्‍थळाला भेट देत विद्यार्थी, पालकांनी निकाल प्राप्त करून घेतला. अवघ्या काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर यशस्‍वी विद्यार्थ्यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव सुरू झाला होता.

नाशिक, जळगाव गैरप्रकारात आघाडीवर

यंदाच्‍या दहावीच्‍या परीक्षेत नाशिक विभागात एकूण ४३ गैरप्रकार आढळले होते. संबंधित विद्यार्थ्यांवर शिक्षण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्‍यान, विभागात नाशिक व जळगाव जिल्‍हा गैरप्रकारांबाबत आघाडीवर असून, या दोन्‍ही जिल्ह्यां‍त प्रत्‍येकी १५ प्रकरणे आढळून आली होती. (latest marathi news)

SSC Exam Result
Nashik Goda Ghat : पर्यटकांना भिकाऱ्यांमुळे ओंगळवाणे दर्शन; गोदाघाटावरील महापालिकेचे निवाराशेड रिकामेच

धुळे पाच आणि नंदुरबार आठ अशा एकूण ४३ प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्‍या तुलनेत गैरप्रकारांच्‍या घटनांमध्ये घट झाली असून, मार्च २०२३ मध्ये ७० जणांवर कारवाई करण्यात आली होती.

राज्‍यातील विभागांची स्‍थिती अशी ः

राज्‍यात सर्वाधिक ९९.०१ टक्‍के निकाल कोकण विभागाचा लागला आहे. त्‍यापाठोपाठ कोल्‍हापूर (९७.४५ टक्‍के), पुणे (९६.४४), मुंबई (९५.८३), अमरावती (९५.५८‍के) यांचा क्रमांक असून, नाशिक विभाग सहाव्‍या स्‍थानी आहे.

नाशिक विभागाचा निकाल असा ः

(नियमित विद्यार्थ्यांचा)

जिल्‍हा प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्‍केवारी

नाशिक ९१,४१४ ८७,५६७ ९५.७९

जळगाव ५५,८८५ ५३,०२८ ९४.८८

धुळे २८,०४१ २६,४४८ ९४.८८

नंदुरबार २०,२४२ १९,३०९ ९५.३९

एकूण १,९५,५८२ १,८६,३५२ ९५.२८

SSC Exam Result
Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

नाशिक विभागात निकालाची वैशिष्ट्ये अशी ः

* २ हजार ८०६ पैकी १ हजार ६ शाळांचा १०० टक्‍के निकाल

* ८२ हजार ३३० विद्यार्थ्यांनी मिळविले ७५ टक्क्‍यांपेक्षा जास्‍त गुण

* ९६.४० टक्‍के मुली उत्तीर्ण व ९३.५८ टक्‍के मुले उत्तीर्ण

* १९ विषयांमध्ये उत्तीर्णांचे प्रमाण राहिले १०० टक्‍के

* १ हजार ७७० विद्यार्थ्यांनी मारली परीक्षेला दांडी

* ९ हजार २३० विद्यार्थी परीक्षेत झाले अनुत्तीर्ण

SSC Exam Result
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.