Divisional Commissioner Praveen Gedam : ऐतिहासिक मूल्यांची जपणूकीतूनच शाश्वत विकास : प्रवीण गेडाम

Nashik News : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे हा शहराचा शाश्वत विकास आहे असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
Commissioner Praveen Gedam
Commissioner Praveen Gedamesakal
Updated on

Nashik News : आगामी सिंहस्थ यशस्वितेसाठी सर्वांनीच प्रयत्नांची गरज आहे. शासन आपल्या पातळीवर रस्ते, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा यावर काम करेल. मात्र, नाशिकचा ऐतिहासिक, सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे काम नागरिकांचे आहे. शहरात सिमेट ठोकळे उभारून विकास होत नाही. तर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे हा शहराचा शाश्वत विकास आहे असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. (Divisional Commissioner Praveen Gedam)

उंटवाडी येथील इंजिनिअर्स इन्स्टिट्यूटच्या अशोका हॉल येथे द नाशिक प्रोजेक्टतर्फे आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राचा शनिवारी (ता. २०) विभागीय महसूल आयुक्त गेडाम यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी संजय पाटील, बकिर जफर, नितीन पटेल, अजय सोनार, चंद्रकांत धामणे, कृष्णा राठी, स्वप्नील जोशी आदी उपस्थित होते.

गेडाम म्हणाले, की सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अजून तीन वर्ष बाकी आहे. नाशिककरांचा उत्सव असलेल्या सिंहस्थासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठा उत्सव असल्याने शासकीय पातळीवर सर्व तयारी केली जाणार असली तरी कुंभाच्या यशस्वी नियोजनासाठी समाजातील प्रतिष्ठितांनी पुढे येण्याची गरज आहे.

जेथे चुकीचे होत आहे, ते लक्षात आणून दिले पाहिजे. आर्किटेक्टने केवळ स्टुडिओत न बसता शहराच्या विकासासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरातील ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी केवळ नाशिकचीच आज औद्योगिक विकासात, आर्थिक विकासात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील १० ते १५ वर्षात नाशिकची अजून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती होणार असून येथील विमानसेवाही चांगली आहे. (latest marathi news)

Commissioner Praveen Gedam
Nashik Dengue Update : डेंगी बाधित रुग्णांचे नमुने तपासणीअभावी पडून; तपासणी किट संपल्यामुळे अहवाल प्रलंबित

येथील नद्या, तसेच सुंदर मंदिरे ही शहराची वेगळी ओळख आहे. मंदिरांमध्ये नारोशंकर, त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, सूर्यनारायण मंदिर, पांडवलेणी याकडे पर्यटक आकर्षित होतात, हीच शहराची जमेची बाजू आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळही जवळच म्हणजे शिर्डीला आहे. वाढत्या शहरीकरणात अजूनही खेड्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. शहराचा विकास किंवा रचना हे आर्किटेक्चरच्या हातात नसून ते समाजातील प्रतिष्ठितांच्या हातात असल्याचे गेडाम यांनी सांगितले.

प्रतिष्ठांतांनी पुढे यावे

सिंहस्थात शासनाकडून नवीन रस्ते, रिंगरोड, प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, वाहनतळ, तात्पुरते निवारागृहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महावितरण यांच्याकडून कामे केली जातात. शहराच्या विकासासाठी काही अडीअडचणी येत असतील तर नक्कीच त्या प्रतिष्ठितांनी वेळीच लक्षात आणून द्याव्यात. त्या दुरुस्त करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घ्यावे असेही गेडाम यांनी सांगितले.

Commissioner Praveen Gedam
Nashik Agriculture News : मक्याची अवघी 50 टक्केच उगवण! निवाणेतील शेतकऱ्याची व्यथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com