Nashik News : केवायसी करा, अन्यथा सिलिंडर सबसिडी, कनेक्शन होईल बंद! एलपीजी गॅस ग्राहकांसाठी 31 जुलै अंतिम मुदत

Nashik News : सर्व एलपीजी गॅस ग्राहकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
KYC cylinders
KYC cylindersesakal
Updated on

तळवाडे दिगर : शहरात तसेच ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणारे एलपीजी सिलिंडर आता केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे गॅस कनेक्शनची केवायसी करा, अन्यथा गॅस सिलिंडर मिळणार नाही. शिवाय कनेक्शनही बंद होऊ शकते, अशी माहिती सटाणा येथील गोदावरी गॅस सर्व्हिसेस व सटाणा गॅस अलाईड एजन्सीच्या संचालकांकडून देण्यात आली आहे. (KYC otherwise cylinder subsidy connection will closed July 31)

सर्व एलपीजी गॅस ग्राहकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अनेक ग्राहकांची केवायसी रखडल्याने गॅस वितरकांना डाटा अपडेट करताना अडचणी येत आहे. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच, जे ग्राहक केवायसी करणार नाही त्यांची सबसिडी बंद होणार आहे. प्राप्त माहितीनुसार केवायसी करण्यासाठी ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. जिल्ह्यातील व तालुक्यातील वितरकांना ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्वच गॅस धारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे.

..तर ‘उज्वला’ची सबसिडी होईल बंद

केवायसी न करणाऱ्या उज्वला योजनेच्या गॅस ग्राहकांना दिली जाणारी ३०० रुपयांची सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सुविधांचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक गॅस एजन्सीधारकांकडून केले जात आहे.

आवश्यक कागदपत्र

गॅसधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. गॅस कार्ड, आधारकार्ड व स्वतः गॅसधारक व्यक्ती फेस रिडींग किंवा बायोमेट्रिकसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. (latest marathi news)

KYC cylinders
Nashik News : भाजपा नेत्याच्या अंगी काँग्रेसचा टी-शर्ट! चांदवड तालुक्यातील राजकीय पटलावर खमंग चर्चा

३२ हजार ग्राहकांची अद्याप ई-केवायसी बाकी

बागलाण तालुक्यामध्ये ६३ हजार नियमित कनेक्शन असून, त्यापैकी ४२ हजार उज्वला योजनेचे कनेक्शन आहेत. यापैकी ३१ हजार गॅस ग्राहकांची ई-केवायसी बाकी आहे. या लाभार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन गोदावरी गॅस सर्व्हिसेस व सटाणा गॅस एजन्सीकडून करण्यात आले आहे.

बागलाण तालुक्यालगतच्या देवळा, कळवण, मालेगाव या भागातील एक लाख २० हजारांच्या पुढे कनेक्शन आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांच्या केवायसी बाकी आहेत. उज्वला गॅस ग्राहकांसाठी केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे.

"सध्या ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांवर तसेच प्रत्येक गावात सहजरीत्या गॅस सिलिंडर उपलब्ध होते. त्यामुळे केवायसी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण, वितरकांना त्यांचा डाटा अपलोड करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांनी केवायसी केली नाही तर आपले कनेक्शन बंद होऊ शकते."

- आनंद पाटील, संचालक, गॅस अलाईड एजन्सी, सटाणा

"यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता. परंतु, आता केवायसीसाठी कडक नियम आहेत. केवायसी नसेल तर ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी ३१ जुलैपूर्वीच केवायसी करून घ्यावी."

- तुषार पाटील, संचालक, गोदावरी गॅस सर्व्हिसेस, सटाणा

KYC cylinders
Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.