Nashik News: महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरीला? प्रशासनाकडून तिघा कर्मचाऱ्यांना नोटिसा

Nashik : मालेगाव येथील महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालयाचा दरवाजा तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त करण्यात आली
Ramdas Borse, Bharat Patil while showing the misplaced documents in the education board office.
Ramdas Borse, Bharat Patil while showing the misplaced documents in the education board office.esakal
Updated on

मालेगाव : येथील महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालयाचा दरवाजा तोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त करण्यात आली. यावरुन महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उपायुक्त सुहास जगताप यांनी पंचनामा केला असून शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित तिघा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. (Nashik Documents stolen Municipal Education Board office malegaon marathi news)

मालेगाव शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून अज्ञातांनी कपाटात असलेली कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे, भरत पाटील, पोपट सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना कार्यालयाचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. कार्यालयीन कागदपत्रांची नासधूस झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने महापालिका शिक्षण मंडळाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावले. कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तर दिली.

त्यानंतर याची माहिती महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना देण्यात आली. त्यानंतर श्री. जाधव यांनी घटनास्थळी येत पाहणी करत उपायुक्त जगताप यांना या संदर्भात सविस्तर पंचनामा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी श्री. बोरसे, श्री. पाटील यांनी करत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. (Latest Marathi News)

Ramdas Borse, Bharat Patil while showing the misplaced documents in the education board office.
Nashik News : लासलगाव ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली! सरपंच निवड प्रक्रिया लांबली

त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. दोषींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात किल्ला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी महापालिकेतील कागदपत्रांच्या तीन गोण्या बुनकर बाजारात सापडल्या होत्या. शिक्षण मंडळाच्या कारभाराबाबत येथे सातत्याने तक्रारी होत असतात.

"शिक्षण मंडळ कार्यालयातून नेमकी कोणती कागदपत्रे गहाळ करण्यात आली किंवा कागदपत्रांची चोरी झाली या संदर्भात तपास केला जात आहे. उपायुक्त जगताप या प्रकरणाचा तपास करीत आहेत. प्रशासनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून ४८ तासात उत्तर मागविण्यात आले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाईल."- रवींद्र जाधव, आयुक्त, मालेगाव महापालिका

Ramdas Borse, Bharat Patil while showing the misplaced documents in the education board office.
Nashik News: सततच्या खंडित वीजपुरवठ्याने कसबे सुकेणेकर हैराण! बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.