Nashik News : आपल्या देशातील खेडी ही चालती-बोलती विद्यापीठे आहेत. तेथे दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असते. इथे कुठलीही गोष्ट लिखित नसते, इथे फक्त सुरू असतात ते वेगवेगळे प्रयोग. त्यामुळे खेड्यातून जी व्यक्ती पुढे आलेली असते, त्या व्यक्तीला पराभूत होण्याची भीती कधीही नसते, असे उद्गार प्रख्यात शास्त्रज्ञ व थायरोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलूमनी यांनी काढले. ते एसएमबीटी फेस्ट २०२४ च्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. (Nashik Those who come from village have no fear of defeat marathi news )
एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, डॉ. किरण पाटील, डॉ. किरण जगताप, प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, डॉ. योगेश उशीर, डॉ. कविता मातेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. वेलूमनी यांचा ‘एसएमबीटी’च्या पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे सन्मान करण्यात आला.
डॉ. वेलूमनी यांनी त्यांच्या खडतर आयुष्याचा प्रवास उलगडला. त्यांचा जन्म हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात झाला. अनेक अडचणी समोर होत्या. मात्र, त्यांनी कधीही परिस्थितीमुळे शिक्षण थांबू दिले नाही. त्यांच्या आईने काबाडकष्ट करीत सर्व भावंडांना उत्तम शिक्षण दिल्याचे डॉ. वेलूमनी अभिमानाने सांगतात. ते म्हणाले, की महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर नोकरी करायची होती. (latest marathi news)
तब्बल ५० पेक्षा अधिक ठिकाणी मुलाखती दिल्या. अनुभव नसल्याने नोकरी नाकारण्यात आली, तेव्हाच आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनायचे, असा निश्चय केला. तमिळनाडू सोडून मुंबईत आल्यावर ‘अनेक किलोग्राम असलेले शरीर सोडून मी केवळ शरीरातील १५ ग्रॅम असलेल्या थायरॉईड ग्रंथींवर काम करण्याचे ठरविले. एक गोष्ट निश्चित करून तीच फोकस करून खोलवर जाऊन अभ्यास करून त्यावर काम केले.
यानंतर मुंबईत छोटेखानी १० बाय १० च्या खोलीत त्यांनी लॅब सुरू केली. आज या लॅबचा विस्तार केवळ महाराष्ट्र किंवा भारतात नाही, तर जगातील दहा देशांत आहे. विशेष म्हणजे, २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना त्यांनी नोकरी दिली. त्यांच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी व्यक्ती खेड्यातील असली पाहिजे, इंग्रजी भाषा आलीच पाहिजे असे काहीही नाही, शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असली पाहिजे असे नियम असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बारावी फेल’मुळे जिंकायला शिकलो
हलाखीच्या परिस्थितीतून अधिकारीपदाला गवसणी घालता येते, याबाबत विद्यार्थ्यांशी वार्तालाप करीत विक्रांत मॅसी याने मने जिंकली. तो म्हणाला, की ‘बारावी फेल’ चित्रपट हे केवळ औचित्य होते, इथून खऱ्या अर्थाने जिंकायला शिकलो. दिल्लीत हजारो मुलं यूपीएससी करण्यासाठी येतात. आज चित्रपटामुळे या परिसरात चार मोफत लायब्ररी सुरू झाल्या आहेत. ‘बारावी फेल’ चित्रपटाच्या यशाचे गमक विक्रांतने या वेळी सांगितले. विक्रांतच्या मालिकांमधील भूमिका आणि मिर्झापूरसारख्या गाजलेल्या भूमिकांबाबतही विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.