Nashik News : जिल्ह्याला 45 हजार घरकुलांचे उद्दिष्ट : डॉ. अर्जुन गुंडे; सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवा

Nashik News : १५ सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, हे काम वेळात व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
Gharkul
Gharkulesakal
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्य शासनाने घरकुल योजना हाती घेतली आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी ४५ हजार घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या घरकुलांचा पहिला हप्ता याच महिन्यात द्यावयाचा आहे.

त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, हे काम वेळात व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. (Dr Arjun Gunde statement 45 thousand houses for district)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.