Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: सातपुरला ऐतिहासिक देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीची जोरदार तयारी

Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून ठीक ठिकाणी शुभेच्छा फलक व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Historical sights at Satpur
Historical sights at Satpuresakal
Updated on

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून ठीक ठिकाणी शुभेच्छा फलक व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सातपूर भीम महोत्सव वतीने सातपूर राजवाडा येथे नागपूर येथील दीक्षाभूमी व मराठवाडा विद्यापीठाचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आलेला आहे. (nashik Dr Babasaheb Ambedkar Jayanti Satpur historic scene work in final stage marathi news)

दि.14 रोजी साजरा होणाऱ्या भीमजंयती कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्य रस्ते चौक,घरोघरी निळे ध्वज लावण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी स्टेज उभारण्यात आले आहे.सातपूर भीम महोत्सवाच्या वतीने ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Historical sights at Satpur
Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त Kartik Vajir यांचं भाषण व्हायरल

दि14 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व भव्य मिरवणूक ,19 रोजी ख्यातनाम गायक प्रकाश पाटनकर यांच्या भिमगीताचा,20 रोजी रवि शेट्टी यांचा आर्केस्ट्रा होणार आहे.या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भीम महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे

''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक देखाव्या साकारावा अशी कल्पना सुचली.सातपूर परिसरात पहिल्यांदा असा ऐतिहासिक देखाव्या साकारण्यात आला आहे.''-भिवानंद काळे, भीम महोत्सव समिती अध्यक्ष

Historical sights at Satpur
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : आंबेडकर जयंतीनिमित्त कल्याणच्या चिमुकल्याची होतेय चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.