Nashik News : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सन २०२२ निवडसुचीकरिता बिगर नागरी राज्य सेवा अधिकारी यांच्यामधून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत निवड करण्यात आली आहे. (Dr. Bhalchandra Chavan Selection in Indian Administrative Service)
राज्यसेवेतील अधिकाऱ्यांमधून महाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवेतील ४ पदांची निवड करण्याकरिता २९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑनलाइन परीक्षा मुंबईत झाली होती. यातील उत्तीर्ण झालेल्या २० अधिकाऱ्यांच्या मुलाखती नवी दिल्लीत २६ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या होत्या.
या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२४) जाहीर झाला. त्यात नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. चव्हाण यांची निवड झाली. (latest marathi news)
डॉ. चव्हाण हे १४ ऑगस्टपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले डॉ. चव्हाण हे पहिलेचे अधिकारी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.