Bharti Pawar : पदावर नसले तरी जनसेवेसाठी कार्यरत : डॉ. भारती पवार

Nashik News : पद नसले तरी शासनात किंमत आहे. त्यामुळे पुन्हा जिद्दीने लढू.असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.
Former Union Minister of State Dr. while interacting with BJP office bearers. Bharti Pawar,
Former Union Minister of State Dr. while interacting with BJP office bearers. Bharti Pawar,esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : पराभव झाला असला तरी मी खचलेले नाही. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतो. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मतदारांनीच कामाची संधी दिली. विरोधकांकडून आरक्षण बदला सारखे खोटा नेरेटिव्ह दलित,आदिवासी समाजात सेट केला. त्यामुळे पराभव झाला. आणि कार्यकर्त्यांनी ही निराश होऊ नये. (Dr. Bharti Pawar statement Although not in office working for public service)

पद नसले तरी शासनात किंमत आहे. त्यामुळे पुन्हा जिद्दीने लढू.असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीनंतर पिंपळगाव बसवंत शहर व परिसरातील कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. गुरुकृपा संकुल सभागृहात झालेल्या बैठकीस माजी जिल्हापरिषद सदस्य यतीन कदम, सतीश मोरे, प्रशांत घोडके.

दिगंबर लिहिते, एल.के.मोरे, प्रकाश घोडके, संदीप झुटे, लखन शिंदे, अल्पेश पारख, सुहास शिंदे, मदन घुमरे, युवराज आथरे, भाऊराव चव्हाण, भारत सूर्यवंशी, नारायण जाधव आदी उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाल्या की, पाच वर्षांत दिंडोरी मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न केले. कांदा प्रश्नाबाबत सातत्याने आवाज उठविला.

पण विरोधकांकडून विखारी प्रचार केला गेला. खोटा नेरेटिव्ह सेट केला गेला. त्यामुळे पराभव झाला असला तरी मी खचलेले नाही. कार्यकर्त्यांनी ही निराश होऊ नये. पुन्हा जिद्दीने लढू. कार्यकर्त्यांच्या आगामी निवडणुकीसाठी मी पाठीशी असेल. केंद्र व राज्य शासनाकडे माझ्या शब्दाला पद नसले तरी किंमत आहे. कोणतेही काम असणार नाही. असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला. (latest marathi news)

Former Union Minister of State Dr. while interacting with BJP office bearers. Bharti Pawar,
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

नगर परिषदेसाठी पाठपुरावा

पिंपळगाव शहरातील नागरिक चुकीच्या प्रचाराला भुलले नाही. कार्यकर्त्यानी मेहनत घेतली. म्हणून पिंपळगाव शहरात सुमारे दीड हजार मतांची आघाडी मिळाली. पिंपळगाव शहराला तीन महिन्यांत नगरपरिषदेचा दर्जा द्यावा असे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. पिंपळगाव ला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

सहा महिन्यात जाणीव

यतीन कदम म्हणाले की, पाच वर्षांत डॉ. पवार यांनी केलेले काम आठवणीत राहील. त्या आदर्श लोकप्रतिनिधी होत्या याची जाणीव जनतेला येत्या सहा महिन्यांत होईल. सतीश मोरे,बापूसाहेब पाटील यांनी मनोगतात डॉ. पवार यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

Former Union Minister of State Dr. while interacting with BJP office bearers. Bharti Pawar,
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.