Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan Awards: गट-तट विसरून, राजकारण न करता गावे आदर्श करा : डॉ. प्रवीण गेडाम

Latest Nashik News : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. ५) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झाला.
District level award distribution ceremony
District level award distribution ceremonyesakal
Updated on

नाशिक : स्वच्छतेमुळे अनेक गावांचा कायापालट होऊन गावे आदर्श झाली आहेत. स्वच्छता अभियानामुळे देशातील बालमृत्यू कमी झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे सर्व गावांनी गट-तट विसरून राजकारण न करता परदेशातील गावांप्रमाणे स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव तयार करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले. (Saint Gadgebaba Gram Swacchta abhiyan Awards)

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. ५) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.

डॉ. गेडाम यांनी स्वच्छतेच्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन करताना लोकसहभागातून आदर्श गाव तयार करण्याचे आवाहन केले. स्वच्छता अभियानामुळे गावाचा कायापालट होत असून, मी स्वत: सरपंच असताना या अभियानात काम केले आहे. किंबहुना स्वच्छता अभियानाच्या कामामुळेच मी खासदारपदापर्यंत पोहोचल्याचे खासदार भगरे यांनी या वेळी सांगितले.

मित्तल यांनी या वेळी मार्गदर्शन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तसेच स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. या वेळी पुरस्कारप्राप्त बारागाव प्रिंप्रीच्या सरपंच संध्या कटके, दहिंदुले ग्रामपंचायतीच्या अधिकारी डॉ. स्वाती देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०१८ पासूनच्या सर्व पुरस्कारप्राप्त ३० ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. (latest marathi news)

District level award distribution ceremony
Ajit Pawar: पुण्यात भाजपकडून अजित पवारांना विरोध कायम.. ते भाजपचे कधीच होणार नाहीत!

अनोख्या पद्धतीने पुरस्कारांची घोषणा

या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ मधील पुरस्कारांची अनोख्या पद्धतीने घोषणा करण्यात आली. मोठ्या अस्वच्छ फलकावरील धूळ झाडूने स्वच्छ करण्यात आली. स्वच्छता केल्यावर त्या खाली पुरस्कारप्राप्त गावांची नावे लिहिण्यात आली होती. यात डाबली (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीने प्रथम, लाडूद (ता. बागलाण) ग्रामपंचायतीने द्वितीय, तर उंबरखेड (ता. निफाड) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला.

सन्मानित गावे

- सन २०१८-१९ : शिरसाणे (चांदवड) प्रथम, लोखंडेवाडी (दिंडोरी) द्वितीय, हनुमाननगर (निफाड) व बोरवट (पेठ) तृतीय विभागून.

- सन २०१९-२० : गोंडेगाव (दिंडोरी) प्रथम, शिरसाणे (चांदवड) द्वितीय, शिवडी (निफाड) व नवे निरपूर (बागलाण) तृतीय विभागून. विशेष पुरस्कार : कोटमगाव (नाशिक), धामणगाव (इगतपुरी) व हनुमाननगर (पेठ).

- सन २०२०-२१ व २०२१-२२ (एकत्रित स्पर्धा) : पिंपळगाव बसवंत (निफाड) प्रथम, सुळे (कळवण) व नवे निरपूर (बागलाण) द्वितीय विभागून, शिरसाळे (इगतपुरी) तृतीय. विशेष पुरस्कार : ओझरखेड (दिंडोरी), खुंटेवाडी (देवळा), पाहुचीबारी (पेठ).

- सन २०२२-२३ : दहिंदुले (बागलाण), राजदेरवाडी (चांदवड), माळवाडी (देवळा). विशेष पुरस्कार : अंदरसूल (येवला), आघार बुद्रुक (मालेगाव), पिंपळगाव बसवंत (निफाड).

- सन २०२३-२४ : डाबली (मालेगाव) प्रथम, लाडूद (बागलाण) द्वितीय, उंबरखेड (निफाड) तृतीय.

District level award distribution ceremony
Nashik Women Vehicle Drivers : आम्‍ही नवदुर्गा- ‘तिच्या’ सारथ्यामुळे संसार अन प्रवास सुखकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.