Nashik ZP News : चारचाकी वाहन योजनेला मिळेना लाभार्थी : डॉ. शिंदे

Nashik News : ग्रामीण भागातील मागासवगीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविण्यास अनुदान देणे या योजनेला लाभार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील २० टक्के सेसअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ग्रामीण भागातील मागासवगीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविण्यास अनुदान देणे या योजनेला लाभार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे. देवळा, पेठ, सुरगाणा, मालेगाव, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी पात्र प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. कमी प्रस्ताव प्राप्त झाल्याने समाजकल्याण विभागाने प्रस्तावासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. जिल्हा परिषदेत सेस निधीचे सर्व विभागांकडून नियोजन सुरू आहे. ( Dr Shinde statement of Beneficiary of four wheeler vehicle scheme )

समाजकल्याण २० टक्के सेसअंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविण्यास अनुदान देणे ही योजना राबविली जाते. त्यासाठी तीन कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना पात्र लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी शिफारशीसह या कार्यालयास २० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. साधरणः प्रत्येक तालुक्यातून १३ याप्रमाणे १९२ प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित होते; परंतु मुदतीत १९० प्रस्ताव प्राप्त झाले खरे, मात्र यातील परिपूर्ण प्रस्ताव केवळ १३० आहेत. ६० प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik News : ‘नो पार्किंग’ क्षेत्र उरले नावालाच! पोलिसांचे दुर्लक्ष; सिडकोत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग

यातही नाशिक (२), पेठ (५), बागलाण (१), त्र्यंबकेश्वर (६), मालेगाव (४), सुरगाणा (१०), देवळा (८) व नांदगाव (१) असे तालुकानिहाय कमी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत, तर सिन्नर (१२), चांदवड (६), इगतपुरी व कळवण प्रत्येकी (६), दिंडोरी (२), येवला (१) असे तालुकानिहाय अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पाच तालुक्यांतून निश्चित दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा कमी पात्र प्रस्ताव प्राप्त झाल्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

तालुकानिहाय प्राप्त झालेले प्रस्ताव

इगतपुरी (१९), कळवण (१९), दिंडोरी (१५), नाशिक (११), पेठ (८), सिन्नर (२५), चांदवड (१९), बागलाण (१२), त्र्यंबकेश्वर (७), मालेगाव (९), निफाड (१५), सुरगाणा (३), येवला (१३), देवळा (४), नांदगाव (११).

Nashik ZP
Nashik Onion News : मालेगाव तालुक्यात 15 टक्के कांदा लागवड वाढणार; तालुक्यात 22 हजार हेक्टरवर कांदा लागवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.