धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक यासह समाजातील सर्व घटक आणि सामान्य माणूस केंद्रस्थानी असेल. त्यांच्या उन्नतीसाठी कटीबध्द असले. यात वकिलांच्या रक्षणाचा मुद्दाही लोकसभेत मांडू, अशी भूमिका भाजप- महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मांडली. (Dr. Subhash Bhamre statement raise issue of protection of lawyers in Lok Sabha)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांनी धुळे वकिल संघाच्या पदाधिकारी व वकीलांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. भारतीय जनता पक्षाचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल पाटील,
अॅड. एम. एस. पाटील, अॅड. देवेंद्रसिंह तवर, अॅड. समीर पंडित, अॅड. आर. डी. जोशी, अॅड. रवी देसर्डा, अॅड. मधुकर भिसे, अॅड. पी. व्ही. दीक्षित, अॅड. एस. आर. पाटील, अॅड. डी. जी. पाटील, अॅड. बी. डी. पाटील, अॅड. चंद्रकांत जावळे, अॅड. पराग पाटील, अॅड. राजेंद्र गुजर, अॅड. नीलेश मेहता, अॅड. जितेंद्र निळे, अॅड. अजय सानप, अॅड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.
सामान्य केंद्रस्थानी
डॉ. भामरे म्हणाले, की दहा वर्षांच्या खासदारकीत मतदारसंघाचा विविध पातळीवर विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. सिंचन, दळणवळण, रेल्वे, पाणी, प्रलंबीत विविध प्रकल्प, शिक्षण, आरोग्य आदी विकासावर भर दिला. त्याचप्रमाणे शेतकरी व समाजातील सर्व घटक, सामान्य माणून विकासाच्या केंद्रस्थानी ठेवला. यात पीडित जनतेसाठी लढा देणारे वकीलही सामाजिक सेवेचा भाग आहेत. अलीकडे त्यांच्यावरही जीवघेणे हल्ल्यांचे असमर्थनीय प्रकार घडत असतात. वकिलांच्या रक्षणार्थ लोकसभेत आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. (latest marathi news)
मोदींना पंतप्रधान करा
देशहितासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. राष्ट्रभक्ती, स्वच्छ भारत मिशनचा नारा, जलजीवन मिशन यासह विविध विकासात्मक अभियानातून समाजातील प्रत्येक घटकासाठी तळमळीने अहोरात्र कामकाज करणारे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यांच्या नेतृत्वातील सरकारने दहा वर्षांत देशभरात पायाभूत सुविधांचे जाळे तयार केले.
आर्थिक सुधारणांना वेग दिला व अकराव्या स्थानावर असलेल्या देशाला पाचवी आर्थिक महासत्ता बनविले आहे. सर्वांगीण विकासाचा हा वेग असाच कायम ठेवत देशाला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याचे मोदी यांचे स्वप्न असून, त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविणे गरजेचे आहे.
त्यामुळे प्रत्येकाने भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावे, अधिकाधिक मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उमेदवार डॉ. भामरे यांनी केले. संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल पाटील यांनी मनोगतात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विकास कामांचा परामर्श घेतला. तसेच वकिल वर्गाच्या अपेक्षा मांडत त्यांना अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले. अॅड. उमेशकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. अर्जुन महाले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.