Nashik News : महापालिकेच्या शाळांमधील घंटा शनिवारी (ता. १४) पासून वाजणार असून शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर जीन्स वर शर्ट, असा पेहराव करू नये अशी सूचना शिक्षणाधिकारी बी. पी. पाटील यांनी केली. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी पाटील यांनी कार्यशाळा घेतली. यात शिक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. (dress code has been implemented for municipal school teachers)
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच शाळेत विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर शालाबाह्य मुला- मुलींना प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
शाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीसाठी सेल्फी व थम पद्धती अवलंबित जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांना ड्रेसकोड सुद्धा लागू करण्यात आला आहे. शिक्षक संवर्गासाठी शासनाने जाहीर केलेल्या ड्रेसकोडनुसारच या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांना सूचना
- हलक्या रंगाचे शर्ट व गडद रंगाची फूल पॅन्ट ट्राउझर, पायात बूट.
- महिलांसाठी साडी सलवार, कमीज, दुपट्टा, चप्पल किंवा आवश्यकतेनुसार बूट आवश्यक.
- शर्टवर कुठल्याही प्रकारचे चित्र विचित्र नक्षीकाम किंवा चित्र नसावी.
- स्काऊट गाइडच्या शिक्षकांना स्काऊट गाइडचा गणवेश बंधनकारक. (latest marathi news)
विद्यार्थ्यांना गोड खाद्यपदार्थ दिला
महापालिकेच्या ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरु होत आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत फुले देवून केले जाणार आहे. शाळांमध्ये स्वागत, प्रभातफेरी, पुस्तक वाटपाचे उपक्रम होतील. शालेय पोषण आहारअंतर्गत विद्यार्थ्यांना गोड खाद्यपदार्थ दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. नवीन प्रवेशासाठी शाळा पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. शाळा व परिसर आकर्षक फुलांनी सजविले जाणार आहेत. शाळेतील सर्व मुला-मुलींना योग व प्राणायाम धडे दिले जाणार आहेत. पहिल्याच दिवसापासून स्मार्ट बोर्डवर अध्यापन केले जाणार आहे.
"शिक्षकांच्या ड्रेसकोड संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांनादेखील विद्यार्थ्यांना ड्रेसकोड लागू आहे." - बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.