मालेगाव : येथील जुना आग्रा रस्त्याचे फेज चारचे काम जलदगतीने सुरू आहे. हॉटेल मदिना ते दरेगावपर्यंत एका बाजूने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. ‘भारत जोडो न्यास’ यात्रेदरम्यान येथे खड्डे बुजविण्यासाठी माती टाकण्यात आली होती. या मातीमुळे दरेगावपासून सदर रस्त्यावर धुराळा उडत आहे. परिसरातील रहिवासी व वाहनचालक धुळीने त्रस्त आहेत. रस्त्याचे काम होईपर्यंत किमान धुळ बसण्यासाठी मातीवर पाणी मारावे, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे. (Nashik Drivers suffered due to dust on old Agra highway)
येथे जुना आग्रा रस्त्याचे काम अनेक अडथळे पार करत होत आहे. मुळात या कामाला दिरंगाई झाली आहे. एका बाजुच्या रस्त्याचे खोदकाम झाले आहे. त्यामुळे दळणवळणासाठी दुसऱ्या बाजुचा रस्ता वापरला जातो. या रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्यास यात्रा १३ मार्चला मालेगावला आली होती. या दरम्यान रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजण्यात आले होते. सध्या वाहने ये-जा करतांना रस्त्यावरील मातीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. (latest marathi news)
मास्कचा होतोय वापर
रस्त्याच्या कडेला चहा हॉटेल, खाद्य पदार्थ, चिकन दुकाने, पंचर, गॅरेज, दूध डेअरी, किराणा दुकान, फर्निचर यासह विविध दुकाने आहे. धुळीमुळे व्यावसायिकांना तोंडावर मास्क लावून काम करावे लागत आहे. धुळीने येथील रहिवाशी, व्यावसायिक व वाहनचालक त्रस्त झाले आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत अधूनमधून टँकरने पाणी मारावे. जेणेकरुन धुळीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.