Nashik Drug Case: शिंदे गावातून आणखी 3 किलो एमडीचा साठा जप्त; नाशिकरोड पोलिसांची कारवाई

Police Inspection
Police Inspectionesakal
Updated on

Nashik Drug Case : शिंदे गावातील भाडेतत्त्वावर दिलेल्या एका गोदामातुन 3 किलो एमडी ड्रग्स आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

नाशिकरोड पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदरची कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, नाशिकमध्ये आदळून येत असलेल्या एमडी साठ्यामुळे नाशिकरोड पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांची झाडाझडती घेण्यात आलयाचे समजते. (Nashik Drug Case 3 kg more stock of MD seized from Shinde village Action of Nashik Road Police Crime News)

मुंबई साकीनाका पोलिसांनी नाशिकमधून 250 ते 300 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केल्याने नाशिक पोलिसांची झोप उडाली आहे.

नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गाव परिसरात असलेल्या एमआयडीसीतील कंपनी आणि गोदामांची माहिती घेणे सुरू केले असता याच परिसरात आणखी एका गोदामात संशयास्पद साहित्य असल्याची माहिती मिळाली होती.

सदरचे गोदाम भाड्याने दोन महिन्यापूर्वी भाड्याने दिले असल्याचे समजते नाशिक रोड पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने गोदामावर छापा टाकला असता, त्या ठिकाणी तीन किलो एमडी ड्रग्स आणि रॉ मटेरियल चा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे सदरची कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती

Police Inspection
Nashik Crime: ससूनमध्ये ड्रग रॅकेट चालवणाऱ्याच्या भावाला पोलिसांनी नाशिकमध्ये पकडले; 300 कोटींचे एमडी जप्त

नाशिक रोड पोलिसांची झाडझडती

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक मध्ये येऊन मोठ्या प्रमाणात यमुनेचा साठा जप्त केल्याने नाशिक रोड पोलीस आणि शहर गुन्हे शाखा संशयाच्या घेण्यात आली आहे.

नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीतच इतक्या मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा सापडल्याने नाशिक रोड पोलीस आणि गुन्हे शाखा काय करीत होते, असा सवाल करीत अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आल्याचे समजते.

काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कॉल डिटेल ची माहिती घेतली जात असल्याचेही समजते एमडी ड्रोक्स संशयितच्या संपर्कात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आह

Police Inspection
Nashik Crime: वडाळा गावात लाखोंचे ड्रग्ज हस्तगत; एका महिलेला घेतले ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.