Nashik MD Drugs Case: नाशिकमध्ये रस्त्यावरच वजनकाटा घेऊन ‘एमडी’ची विक्री! एकाला अटक; 58 हजारांची एमडी पावडर जप्त

Crime News : पोलिसांनी यापूर्वी एमडी ड्रग्जचे अड्डे उदध्वस्त करूनही शहरात या अंमली पदार्थांची पोलिसांच्या नाकावर टिच्चून विक्री सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
A suspect who came to sell MD drugs was arrested at Samangaon Road. A team of Unit Two of the City Crime Branch along with material on the occasion
A suspect who came to sell MD drugs was arrested at Samangaon Road. A team of Unit Two of the City Crime Branch along with material on the occasionesakal
Updated on

नाशिक : नाशिकरोड येथील सामनगाव रोडवर भरदिवसा रस्त्यालगत वजनकाटा घेऊन भाजीपाला-फळं विक्री होत असते, अगदी त्याप्रमाणेच एमडी (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थाचीही विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलिसांनी यापूर्वी एमडी ड्रग्जचे अड्डे उदध्वस्त करूनही शहरात या अंमली पदार्थांची पोलिसांच्या नाकावर टिच्चून विक्री सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik MD Drugs Case)

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सामनगाव रोडवर वजनकाटा घेऊन एमडी ड्रग्ज विक्री करणार्या संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५८ हजारांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे. अशारितीने शहरात आणखी कुठे-कुठे एमडीची विक्री होते आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. (Nashik Drugs crime Sale of MD on street marathi news)

किरण चंदू चव्हाण (२३, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) असे एमडी ड्रग्ज विक्री करीत असताना अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर गुन्हे शाखेची पथकांमार्फत शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना सामनगाव रोड परिसरात एकजण एमडी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची खबर सोमवारी (ता. १८) मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सापळा रचण्यास सांगितले असता, सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने सामनगाव रोडवरील सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या शिवशक्ती टायर वर्कससमोर सापळा रचला होता.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित किरण चव्हाण हा सामनगाव रोडवर आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास हेरले आणि ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५८ हजार १७० रुपयांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज्‌ जप्त करण्यात आली.

त्याच्याकडून डीजीटल वजनकाटा, दोन मोबाईल, रिकामे प्लॅस्टिकचे पाऊच असा ६८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक काळे हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

A suspect who came to sell MD drugs was arrested at Samangaon Road. A team of Unit Two of the City Crime Branch along with material on the occasion
Crime News: कामावरुन आलेल्या पतीला जेवण देण्यास पत्नीने केला उशीर अन् गेले दोन जीव; वाचा धक्कादायक घटना

दोघांचा शोध सुरू

पोलीस चौकशीमध्ये संशयित किरण चव्हाण याने संशयित राहुल सोनवणे (रा. जय भवानीरोड, फर्नांडिसवाडी, नाशिकरोड), रोहित नेने (रा. चेहेडी पंपींग, नाशिकरोड) या दोघांकडून वेळोवेळी विकत घेतल्याची कबुली दिली आहे. या दोघा संशयितांचा शहर गुन्हेशाखेची पथके शोध घेत आहेत. यातून एमडी ड्रग्जचे आणखी मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

मोठे रॅकेटची शक्यता

संशयित किरण चव्हाण हा सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेज जवळच एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आला असता, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्यावरून संशयित किरण हा सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्जस्‌ विकत असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.

यापूर्वीही गेल्या सप्टेंबरमध्ये शहर पोलिसांनी एकाला याच ठिकाणी एमडी ड्रग्जसह एकाला अटक केली होती. त्यानंतर सनी पगारे, अर्जून पिवाळ टोळी पोलिसांच्या हाती लागली आणि सोलापूरातील त्यांचे दोन कारखाने पोलिसांनी उदध्वस्त केले होते. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासातूनही पोलिसांच्या हाती मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

A suspect who came to sell MD drugs was arrested at Samangaon Road. A team of Unit Two of the City Crime Branch along with material on the occasion
Crime News: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कपलची हत्या; पुरुषाच्या मुलाने तर महिलेच्या वडिलांनी मिळून केला खून

गतवर्षी मोठ्या कारवाया

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच गेल्या वर्षी एमडी ड्रग्जसंदर्भात मोठ्या कारवाया झाल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये शिंदेगावात एमडीचा कारखाना व गोदाम पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यातून पोलिस ललित - भूषण पानपाटील या ड्रग्जमाफियांच्या टोळीपर्यंत पोहोचले.

त्याचवेळी वडाळा गावातील ‘बडी भाभी’चा एमडी ड्रग्ज विक्रीचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला आहे. तर, सप्टेंबर २०२३ मध्ये सामनगाव रोडवर एमडी विक्रेत्याला अटक केल्याने सनी पगारे, अर्जून पिवाल या ड्रग्ज माफियांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्यांचे सोलापूरातील दोन कारखानेही उदध्वस्त केले.

A suspect who came to sell MD drugs was arrested at Samangaon Road. A team of Unit Two of the City Crime Branch along with material on the occasion
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.