नाशिक : वर्षभरापूर्वी भांग विक्री व साठा केल्याप्रकरणात अटक केलेला संशयिताने जामीनावर बाहेर आला आणि पुन्हा गांजाची तस्करी सुरू केली. मात्र शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने कारमधून गांजा तस्करी करताना दोघांना अटक केली आहे. कारमधून सुमारे २० लाखांचा १०१ किलोचा गांजा जप्त केला आहे. (Nashik Drugs Crime Smuggling Ganja from car marathi news)
ज्ञानेश्वर बाळू शेलार (३२, रा. जयशंकर रो हाऊस, मानकर मळा, मखमलाबाद ), निलेश अशोक बोरसे (२७, रा. मातोश्री निवास, औंदुबरनगर, अमृतधाम) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाकडून शहरात गस्त सुरू आहेत.
पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची खबर मिळाली होती. पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांना माहिती दिल्यानंतर सापळा रचण्याची सूचना करण्यात आली. (latest marathi news)
त्यानुसार सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत तोडकर, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, भूषण सोनवणे, किशोर रोकडे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, अर्चना भड यांच्या पथकाने म्हसरुळ हद्दीमध्ये सापळा रचला. यावेळी संशयित हे कारमधून (एमएच ०४ बीक्यू ०७७८) गांजाची तस्करी सुरू असल्याचे आढळून आले. कारमधून २० लाख ३६ हजार ६०० रुपयांचा १०१ किलो ८८० ग्रॅम गांजा पथकाने जप्त केला.
शेलार पुन्हा जेरबंद
शहर गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने शालिमार परिसरातील वावरे लेनमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये जानेवारी २०२३ मध्ये धाड टाकली होती. त्या कारवाईत ६०४ किलो भांग जप्त करण्यात आली होती. या गुन्ह्यात शेलार यास अटक केली होती. मात्र जामिनावर सुटल्यावर संशयित शेलार याने पुन्हा गांजा प्रकरणात पोलिसांनी त्यास पुन्हा अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.