नाशिक : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार व कर्मचारी संघटना समन्वय समितीने एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते व सुविधा लागू करण्यात याव्यात, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सर्व सुविधा मिळाव्यात या व इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात संप पुकारला आहे.
या संपाचा फटका सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आणि ये-जा करणाऱ्यांना बसला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असून एसटीचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. सर्व एसटी बस आगारात अन प्रवासी मात्र रस्त्यांवर अशी स्थिती असून खासगी वाहनांनी अव्वाच्यासव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांच्या हालात भरच पडली. (Due to agitation of ST employees in district)