Nashik News : पाणीसाठा घटल्याने माशांचे दर कडाडले; धरणे, जलाशयाने तळ गाठल्याने उत्पन्नात घट

Nashik News : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक धरणे, तलाव, जलाशय कोरडेठाक पडले आहे. धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने माशांचे उत्पन्न घटले.
Mahendra Shinde selling fish in the market at Malegaon Ram Setu Bridge.
Mahendra Shinde selling fish in the market at Malegaon Ram Setu Bridge.esakal
Updated on

मालेगाव : गेल्या वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक धरणे, तलाव, जलाशय कोरडेठाक पडले आहे. धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने माशांचे उत्पन्न घटले. सध्या धरणे, तलाव, पाझर तलाव, शेततळे कोरडी आहेत. उत्पन्न घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माशांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. गिरणा धरणातील भडक्या माशाला सर्वाधिक मागणी आहे. (Due to drought conditions lack of sufficient water storage in dams and yield of fish has decreased)

शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून माशांचे दर वाढले आते. येथे गिरणा धरणातील भडका, पंकज, कोंबड, गावठीवामची विक्री होत आहे. यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने माशांचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे येथे मुंबईहून येणारी माशांची आवक काही प्रमाणात वाढली होती. मुंबईची पापलेट, पिवळीवाम, कोळंबी, काळीवाम, सुरमई, ओले बोंबील, बांगळा, शिंगाळा यांच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत.

७ जूनपासून समुद्रात भरती ओहोटी येते. त्यामुळे राज्य सरकार मच्छिमार बांधवांना समुद्रात जाण्यास मज्जाव करते. अनेक होड्या समुद्रात जात नाही. त्यामुळे मासे पकडले जात नसल्याने माशांची मागणी वाढते. मागणी वाढल्याने माशांचा तुटवडा भासतो. त्यामुळे सर्वत्र माशांचे दर वाढले आहेत. काही व्यापारी पावसाळ्यापूर्वीच मासे त्यांच्या गोडाऊनला स्टोअरेज करून ठेवतात. मालेगावी स्टोअरेज असलेली मासे विक्रीसाठी येत आहे.

शहरात मच्छी बाजार, टेहरे, आजाद नगर, नवीन बसस्थानक, पिवळापंप, चंदनपुरी, रामसेतु पुल यासह विविध भागात माशांचा बाजार भरतो. येथे सर्वात जास्त भडक्या माशाला मागणी असते. भडका येथील गिरणा धरणातील मासा आहे. सामान्य नागरिक भडक्याला पसंती देतात. शहरात मासे विक्री करणारी शेकडो दुकाने लागतात. पावसाळ्यात मासे येत नसल्याने काही प्रमाणात दुकानेही घटतात. (latest marathi news)

Mahendra Shinde selling fish in the market at Malegaon Ram Setu Bridge.
Nashik News : पेपरफुटीविरोधात कडक कायदा करावा! नाशिक शहर काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पटोले, थोरात यांच्याकडे मागणी

माशांचे दर असे (किलो)

भडका - १००

पंकज - २००

गावठी वाम - ५००

पापलेट व पिवळी वाम - १२००

कोळंबी व काळीवाम - ६००

सुरमई - १०००

ओले बोंबिल व बांगळा - ४००

शिंगाळा - ८००

"पावसाळा लागल्यापासून येथे मासे येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भाव दुप्पटीने वाढतात. येथील टेहरे बाजारात मुंबई, पैठण, नवापूरसह गिरणा धरणातील मासे विक्रीसाठी येतात. हा बाजार गेल्या दशकभरापासून भरतो आहे." - महेंद्र शिवदे, मासे विक्रेता, मालेगाव

Mahendra Shinde selling fish in the market at Malegaon Ram Setu Bridge.
Nashik Tax Recovery : कर्जवसुली थांबवा, अन्यथा जनआंदोलन! शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com