Nashik News : दुष्काळी परिस्थितीचा सामना करत या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकवले. पेरणीपासूनच पाणीटंचाईचे ग्रहण शेतीला लागण्याने अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून अतिशय कष्टाने पीक जगविले होते. निसर्गाच्या लहरीपणाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करताना शेतकऱ्यांना खर्च भरमसाठ करून उत्पन्न मात्र कमी मिळाले. त्यातच काढणीनंतरच भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यापेक्षा घरात साठविण्याचे ठरविले. (Nashik Due to fall in prices farmers decided to store soybeans at home instead of selling them)
पाच ते सहा महिने झाले, तरी सोयाबीन भाववाढीची चिन्हे दिसत नाहीत. उलटपक्षी दिवसेंदिवस भाव गडगडत आहेत. दुसऱ्या बाजूला शेती निविष्टांचे दर गगनाला भिडत आहेत. शेतीसाठी येणारा खर्च वाढत आहे आणि उत्पन्न कमी येत आहे. मागील तब्बल दीड वर्षापासून सोयाबीनचा भाव पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहेत.
सोयाबीनला दीड वर्षापासून सर्वांत नीचांकी दर
जानेवारी २०२३ : ५०५० रुपये
फेब्रुवारी : ४८८० रुपये
मार्च : ४९६०
एप्रिल : ४८३०
मे : ४८५०
जून : ४८१०
जुलै : ४७२०
ऑगस्ट : ४६४०
सप्टेंबर : ४६५०
ऑक्टोबर : ४६००
नोव्हेंबर : ४७७०
डिसेंबर : ४६२०
जानेवारी २०२४ : ४५१०
फेब्रुवारी : ४४३०
मार्च : ४३२०
सोयाबीनचा पेरा घटण्याचा अंदाज
निफाड तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी खरीप हंगामात मका आणि सोयाबीन पिकांची पेरणी करतात. मात्र, या वर्षी सोयाबीन लागवडीतून शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली निराशा बघता येत्या खरीप हंगामात २० ते २५ टक्के सोयाबीनचा पेरा कमी होणार आहे. मका पिकास वर्षभर बाजारभाव टिकून असल्याने आता बहुसंख्य शेतकरी मका पिकाकडे वळतील.
"दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली आणि बाजारभाव स्थिर नसल्याने सोयाबीन साठवणूक केली. बँकेचे, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन रब्बी हंगामाची पिके उभी केली. अजूनही सोयाबीनची भाववाढ न झाल्याने चार पैसे मिळण्याची आशा मावळून कर्जाचा डोंगरच वाढत आहे."-राहुल जगताप, युवा शेतकरी, तारुखेडले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.