नाशिक : मराठी नववर्षाचा पहिला सण गुढी पाडवा मंगळवारी (ता. ९) साजरा होणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवार कारंजा परिसरात विक्रेते, वाहनचालक आणि रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली तर मेनरोडकडे जाणार्या रस्त्यावर पूर्णत: कोंडी झाली होती. (nashik due to Gudi Padwa festival central market of city was crowded marathi news)
मंगळवारी (ता. ९) गुढी पाडवा साजरा करण्यासाठी नाशिककरांमध्ये उत्साह संचारला आहे. यासाठी बाजारपेठांमध्ये हार-कडयासह पूजेच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवार कारंजा परिसरात हार-कडे विक्रेत्यांसह गुढी उभारण्यासाठी लागणारी काठी, कडूलिंब-आंब्यांची पानेही विक्रीला होती.(latest marathi news)
तसेच, लहान आकारातील आकर्षक गुढीही विक्रीला होत्या. या आकर्षक गुढी लहानग्यांचे लक्ष वेधून घेत होते. रविवार कारंजा वाहतूक बेटाभोवतीच विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने नेहमीप्रमाणेच, वाहतुकीची कोंडी सातत्याने उद्भवत होती. त्यात भर अस्तव्यस्तपणे पार्क केलेल्या दुचाक्या आणि रिक्षाचालकांमुळे होत होती.
रविवार कारंजाकडून मेनरोडकडे दुचाकी जाण्यासाठी रस्ता असतानाही रिक्षाचालकही त्याचठिकाणी गर्दी करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत होती. त्याचा परिणाम रविवार कारंजावरील वाहतुकीवर सातत्याने होत होता. तर, यशवंत मंडईसमोरही दुचाक्या पार्क करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला मार्ग अरुंद होऊन कोंडीची समस्या निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत अशीच स्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.