Screen Time : डोळ्यांच्‍या कोरडेपणाचे प्रमाण 40 टक्क्‍यांनी वाढले

Nashik News : क्रीनसमोर तासनतास घालविण्यामुळे ‘स्‍क्रीन टाइम’ मध्ये वाढ झालेली आहे. मात्र यामुळे गंभीर परिणाम समोर येत आहे.
Screen Time
Screen Timeesakal
Updated on

Nashik News : सकाळी उठल्‍यापासून रात्री झोपेपर्यंत स्‍मार्टफोन, टिव्‍ही, लॅपटॉप, संगणक अशा विविध गॅझेटच्या स्‍क्रीन आपल्‍या डोळ्यांसमोर असतात. कधी मनोरंजन तर कधी कामानिमित्त स्‍क्रीनसमोर तासनतास घालविण्यामुळे ‘स्‍क्रीन टाइम’ मध्ये वाढ झालेली आहे. मात्र यामुळे गंभीर परिणाम समोर येत असून. (due to increasing Screen Time Dryness of eyes increased by 40 percent)

डोळ्यांतील कोरडेपणाच्‍या तक्रारींमध्ये ४० टक्क्‍यांपर्यंत वाढ झाल्‍याचे निरीक्षण सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्ररोग तज्‍ज्ञ डॉ. अंगना साहू यांनी नोंदविले आहे. विशेषतः १५ ते ४० वयोगटात डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण अधिक असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे. डोळ्यांच्या कोरडेपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष घातक ठरु शकते.

पालकांनी स्वतः व आपल्या मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमीत कमी कसा राहील, याकडे प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. संगणक, मोबाईल व टेलिव्हिजनच्या अतिवापरामुळे ‘ड्राय आय’ समस्या वाढत असून डोळ्यांतील पाणी, लिपिड व म्युकस या तीन घटकांच्या असमतोलामुळे कोरडेपणाची समस्या उद्भवत आहे.

यामध्ये डोळ्यांतील अश्रूंचे प्रमाण कमी होणे किंवा अश्रूंची निर्मिती मंदावणे किंवा अपेक्षेप्रमाणे अश्रूंचा दर्जा-गुणवत्ता नसणे किंवा अनुग्रंथी ब्लॉक होणे, अशा प्रकारच्या विविध समस्या आढळून येत आहेत. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळे कोरडे पडत आहेत. (latest marathi news)

Screen Time
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

‘सीव्‍हीसी’पासून सावध

स्क्रीनच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या कोरडेपणाच्या समस्येला कॉम्प्युटर व्हीजन सिन्ड्रोम’ (सीव्हीसी) म्हटले जाते. स्क्रीनचा अधिकाधिक वापर करणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक दिसते. रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) प्रमाण अधिक असल्‍याचे डॉक्‍टरांचे मत आहे.

डोळ्यांच्‍या कोरडेपणाला दूर ठेवण्यासाठी ही काळजी घ्या..

- ‘अ’ जीवनसत्त्वाची (गाजर, पपई, मुळा, चीज, मासे आदी) फायदेशीर ठरते.

- स्‍क्रीन टाइम घटविणे, तक्रार जाणवल्यास नेत्रविकार तज्‍ज्ञांच्‍या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा.

- प्रदूषण, धूळ, वाढते वय, डोळ्यांचे इतर आजार आदींमुळेही ‘ड्राय आय’ची होऊ शकते समस्या

- मोबाईल/छोट्या उपकरणांचा ‘स्क्रीन टाइम’ ३० मिनिटांपेक्षा जास्त नको.

- संगणकावर काम करताना प्रत्येकी २०-३० मिनिटांनी ब्रेक घ्यावा.

- दुचाकीवर हेल्मेट वापरणे, आवश्‍यकतेनुसार गॉगल वापरावा.

- डोळ्यांच्या समस्या जाणवल्यास त्वरित तज्ञांना दाखवणे

"वाढलेला ‘स्क्रीन टाइम’ डोळ्यांच्‍या कोरडेपणासाठी कारणीभूत ठरत असून ‘ड्राय आय’च्‍या रुग्‍णांचे प्रमाण लक्षणीयरित्‍या वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. स्क्रीन जितका छोटा तितका त्रास मोठा, हे समीकरण लक्षात ठेवावे. आवश्‍यक खबरदारी घेताना लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. डोळ्यांची योग्‍य निगा राखावी." - डॉ. अंगना साहू, नेत्ररोग तज्‍ज्ञ, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.

Screen Time
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.