National Junk Food Day : ‘जंकफूड’ मुळे लठ्ठपणा समस्या बनली आव्हान; डॉक्टरांकडे सर्वाधिक तक्रारी

National Junk Food Day : डॉक्टरांकडे येणाऱ्या १०० रुग्णांपैकी ३० रूग्ण वजनाची तक्रार घेऊन येतात. आत्ताच्या घडीला लठ्ठ होणारी मूल आरोग्य यंत्रणा आणि पालकांसमोरच सर्वात मोठे आव्हान आहे.
National Junk Food Day
National Junk Food Dayesakal
Updated on

National Junk Food Day : डॉक्टरांकडे येणाऱ्या १०० रुग्णांपैकी ३० रूग्ण वजनाची तक्रार घेऊन येतात. आत्ताच्या घडीला लठ्ठ होणारी मूल आरोग्य यंत्रणा आणि पालकांसमोरच सर्वात मोठे आव्हान आहे. एक चिप्सचे पॅकेट खाल्ले तरी, ते एकवेळच्या जेवणाप्रमाणे असते. त्यासाठी आपण काय खातो त्याचे मोजमाप झाले पाहिजे. त्यानुसार आहार घेण्याचा सल्ला तज्ञ देतात. पॅक फूड अधिक काळ टिकण्यासाठी त्यामध्ये शुगर, फॅट्स, कलर, मिठाचे प्रमाण अधिक असते. (Due to junk food obesity has become problem challenge is most complaints to doctor)

ते खाल्यानंतर कालांतराने त्याचे परिणाम शरीरावर जाणवायला लागतात. वजन वाढल्यानंतर हालचालींवर मर्यादा येतात. चालणे, फिरणे बंद होऊन गुडघे, सांधेदुखी सुरू होते. जिभेचे चोचले पुरवणारे जंक फूड खायला कितीही स्वादिष्ट लागत असले तरी शरीराचे अतिरिक्त वजन वाढविण्यात मोठा हातभार लावतात. त्यामुळेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ओबीसिटी’ प्रमाण सर्वाधिक दिसून येते.

वय आणि उंचीच्या मानाने अतिरिक्त वजन म्हणजे लठ्ठपणा मानला जातो. लठ्ठपणा चेष्टेचा विषय ठरत असला तरी, अतिरिक्त वजन मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार सारख्या समस्यांना निमंत्रण देते. पुढे वजनामुळे हालचालींवर मर्यादा येऊन चालणे फिरणे कमी होते. जंक फूडमध्ये पिझ्झा, बर्गर, फेंच्र फ्राय, केक, चिप्स थोडक्यात मैदायुक्त, बेकरी व तेलकट पदार्थ मोडतात. मुलांना शाळेत घ्यायला पोचविणाऱ्या व्हॅन असल्यामुळे त्यांचे चालणे-फिरणे कमी झाले आहे. (latest marathi news)

National Junk Food Day
World Food Day 2023: आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी

झटपट भूक भागवणारे ‘रेडी टू इट पदार्थ’ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. पाश्चात्त्य देशातील खाद्यसंस्कृती भारतात मोठ्या प्रमाणात रूजल्यामुळे जंकफूड खाणे जीवनशैलीचा भाग झाला आहे. लठ्ठपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वजन आटोक्यात आणणे अवघड बनते. त्यासाठी वय आणि उंचीनुसार वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते.

आहारासाठी सुमपदेशनाची गरज

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे तरुणवर्ग सर्वाधिक आजारांचा सामना करत आहे. भारत तरुणांचा देश असला तरी, ३८ टक्के तरुण अतिरिक्त वजनाने त्रस्त आहेत. आईवडील नोकरदार असल्याने पॅकेट फूड, रेडी टू इट पदार्थ खाल्ले जातात. आहारासाठी आता समुपदेशनाची गरज असून रोजच्या घेतल्या जाणाऱ्या आहारातून शरीराला किती घटक मिळतात आणि त्यातून किती एनर्जी वाया जाते त्यानुसार आहार घेणे गरजेचे झाले आहे.

''भारतीय खाद्यसंस्कृती आरोग्याची उत्तम गुरुकिल्ली आहे पण जागतिकीकरणामुळे जगातील वेगवेगळे पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृतीत ढवळाढवळ करीत आहे. याचा लहान मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून कोवळ्या वयात मधुमेह, कर्करोग, ओबीसीटी, जास्त नंबरचा चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. आहाराच्या सवयीत बदल केल्याशिवाय निरोगी शरीर बनणे अवघड आहे.''- प्रा. वैशाली चौधरी, फूड प्रॉडक्ट ॲन्ड टेक्नॉलॉजी

National Junk Food Day
National Junk Food Day : जंक फूड खाल्ल्याने मुलांना होत आहेत हे 'तीन' धोकादायक आजार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.