Nashik News : पदस्थापना नसल्याने शिक्षकांचे रखडले वेतन!

Nashik News : जिल्हांतर्गत बदलीने ८० शिक्षक आले असून, यातील आठ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पदस्थापना दिली आहे.
Nashik Teacher News
Nashik Teacher News esakal
Updated on

Nashik News : जिल्हांतर्गत बदलीने ८० शिक्षक आले असून, यातील आठ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पदस्थापना दिली आहे. मात्र, उर्वरित ७२ शिक्षकांना चार महिने उलटूनदेखील पदस्थापना मिळालेली नाही. लोकसभा निवडणूक व त्यापाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदस्थापना देण्यात अडसर होता. (Due to lack of posting teachers salary has stopped)

मात्र, आचारसंहिता संपल्यानंतरही विभागाकडून पदस्थापना देण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. प्रशासनाने या शिक्षकांना तोंडी आदेशावर काम करायला लावले आहे. मात्र, पदस्थापना निश्चित नसल्याने हे शिक्षक चार महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्याला ८० शिक्षक मिळाले. जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना तत्काळ पदस्थापना मिळणे अपेक्षित आहे.

मात्र यातील आठ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली अन् लागलीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या शिक्षकांना आचारसंहितेनंतर पदस्थापना दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर लागलीच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली.

त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता ५ जुलैपर्यंत होती. लोकसभा व विधान परिषदेच्या दोन्ही आचारसंहिता संपुष्टात आलेल्या आहेत. मात्र, अद्यापही या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत कार्यवाही झालेली नाही. याचदरम्यान, या शिक्षकांना तोंडी आदेशाने शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने शिक्षक दिलेल्या शाळांमध्ये रुजू होत काम करत आहे. परंतु, शाळेनुसार पदस्थापना नसल्याने या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. (latest marathi news)

Nashik Teacher News
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

पदस्थापना नसल्याने वेतन मिळत नाही. वेतन रखडल्याने कर्जाचे, गृहकर्जाचे हप्ते गेलेले नाहीत. हप्ते जात नसल्याने दंड बसत आहे. शिवाय सिबिलही डाउन होत आहे. त्यामुळे पुढील कर्जांना अडचणी येत आहेत. शाळेचे गाव न मिळाल्यामुळे शिक्षकांना राहण्याचे नियोजन करता येत नाही.

ते नियोजन नसल्याने शिक्षक-शिक्षिकांच्या मुलांचे शाळा प्रवेश होऊ शकलेले नाहीत. पदस्थापना नसल्याने शिक्षकांना अडचणीस सामोरे जावे लागत असल्याने तत्काळ पदस्थापना द्यावी, अशी मागणी या शिक्षकांकडून होऊ लागली आहे.

परस्पर बदल्या नको

तोंडी आदेशान्वये शिक्षक काम करत असतानाच ५ जुलैला प्रशासनाने पत्र काढत या शिक्षकांच्या परस्पर बदल्या करू नयेत, असे आदेश दिल्याचे समजते. आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यांतून शिक्षक जिल्हा परिषदेत हजर झाले असून, संबंधित शिक्षकांना आचारसंहिता कालावधीत तालुकास्तरावर शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तोंडी आदेशान्वये शाळेवर अध्यापनासाठी पाठविले आहे.

Nashik Teacher News
Nashik Accident News : 'एक्साईज'चे वाहन उलटून चालक ठार; मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतानाची घटना

आचारसंहिता संपल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना दिली जाणार आहे. असे असताना तालुकास्तरावर कार्यरत शिक्षकांना तोंडी आदेशानुसार इतर शाळेत परस्पर पाठविण्यात येत असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुका स्तरावरून परस्पर शिक्षकांची शाळा बदलताना कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी अथवा गटस्तरावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जात नाही.

त्यामुळे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व पदाधिकारी यांच्याकडून तक्रारी येत आहेत. त्यासाठी लेखी पूर्वपरवानगीशिवाय तालुकास्तरावरूनच परस्पर पदस्थापना करण्यात येऊ नये. शैक्षणिक कामकाजासाठी शिक्षकास अन्य शाळेत अध्यापनासाठी पाठविण्यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

"आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी प्रस्ताव दाखल झाला होता. मात्र, आचारसंहितेमुळे त्यास अडसर आला होता. आचारसंहिता संपल्याने आता लवकरच समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यासाठी तारीख निश्चित केली जाईल." - डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Nashik Teacher News
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.