Nashik News : त्रुटींमुळे पाथर्डी फाटा भाग तहानलेलाच! कमी दाब, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त

Nashik News : मुकणे धरणातून पाईपलाईनद्वारे शहरात पाणी आल्यानंतरदेखील पाथर्डी फाटा भागातील नागरिकांचे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी स्थिती झाली आहे.
Jalakumbh which has been waiting for water for 12 years in Dnyaneshwarnagar area. In the second photograph, the work of the Jalakumbha which has come up on Pragatipatha at some distance in the same area
Jalakumbh which has been waiting for water for 12 years in Dnyaneshwarnagar area. In the second photograph, the work of the Jalakumbha which has come up on Pragatipatha at some distance in the same areaesakal
Updated on

इंदिरानगर : मुकणे धरणातून पाईपलाईनद्वारे शहरात पाणी आल्यानंतरदेखील पाथर्डी फाटा भागातील नागरिकांचे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी स्थिती झाली आहे. मुख्यतः पाथर्डी फाटा आणि इंदिरानगरची वाढती लोकसंख्या गृहीत धरून तहान भागविण्याच्या मुख्य उद्देशाने ही थेट जलवाहिनीची योजना कार्यान्वित झाली. मात्र मुंबई नाका येथील कालिका पंपिंग बंद केले. त्यामुळे तेथून भरणारे जलकुंभदेखील मुकण्याच्या पाण्यावर भरणे सुरू झाल्याचे समजते. (due to low pressure inadequate water supply in Pathardi Phata )

सध्या जुने नाशिकमधील कठडा, अमरधाम, राजीवनगर येथील चड्डा पार्क, पांडवनगरी, भाभानगर, दीपालीनगर, सुचितानगर, अशोक मार्ग, पाथर्डी गावाजवळील भवानी माथा, वासननगर, राणेनगर आदी भागातील जलकुंभ यावर भरले जात आहेत. पहाटे साडेचार वाजता पाथर्डी फाटा भागातील जलकुंभ भरण्याच्या वेळी व्हॉल्व्ह सुरू केला की नैसर्गिक उतारामुळे बहुतांश पाणी थेट पूर्व विभागातील टाक्यांमध्ये निघून जाते. त्यामुळे हे जलकुंभ भरत नाहीत आणि कायमस्वरूपी या भागाला कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ही त्रुटी अधिकारीदेखील खासगीत मान्य करतात.

कालिका पंपिंग सुरू केले तर हा प्रश्न सुटू शकेल. इतर टाक्या भरत असताना वेळेचे नियोजनच होत नसल्याने वासननगर भागातील ज्ञानेश्वरनगर येथील जलकुंभ बांधून बारा वर्षानंतरदेखील वापराविना आहे. कारण भरण्यासाठी २४ तासांमध्ये आवश्यक असणारा वेळच मिळत नाही. विशेष म्हणजे याच जलकुंभापासून अवघ्या हजार फूट अंतरावर अजून एका जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. आधीच्या जलकुंभात १२ वर्षांपासून पाण्याचा थेंब नसतांनाही हा जलकुंभ का बांधत असतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या आणि इतर जलकुंभ पूर्ण क्षमेतेने भरले तर प्रभाग क्रमांक ३० आणि ३१सह इंदिरानगरचा पाण्याचा प्रश्न जवळपास सुटणार आहे. (latest marathi news)

Jalakumbh which has been waiting for water for 12 years in Dnyaneshwarnagar area. In the second photograph, the work of the Jalakumbha which has come up on Pragatipatha at some distance in the same area
Nashik NMC News : शासनाला 14 वर्षानंतर जाग! कोल्हापूरचा निधी नाशिककडे वळविल्याचे आले लक्षात

कर्मचाऱ्यांची गरज

कालिका पंपिंग पुन्हा सुरू केले तर त्यावर काही भार टाकून या जलकुंभासह इतर जलकुंभ भरणेदेखील शक्य होणार आहे. सध्या उपअभियंता गोकुळ पगारे यांच्याकडे सिडकोच्या पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडे प्रभाग २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, पूर्वच्या प्रभाग २२ आणि सातपूर येथील काही भाग आहे. तर कनिष्ठ अभियंता चव्हाण यांच्याकडे प्रभाग २४ ची जबाबदारी आहे. एवढ्या प्रभागांची व्याप्ती लक्षात घेता या ठिकाणी पूर्णवेळ एका उपअभियंता आणि तीन कनिष्ठ अभियंता तसेच, मिस्तरी आणि इतर कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र वर्षानुवर्षे आहे त्या व्यवस्थेत पुरवायचे म्हणून पाणी पुरवले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेचा प्रभाव यामुळे शून्य झाला आहे.

पाणीवितरण व्हॉल्वमनच्या भरवशावर

पाणीवितरण सर्वार्थाने व्हॉल्वमनच्या भरवशावर असल्याने कुठे कमी, तर कुठे जास्त पाणीपुरवठा होत आहे. पगारे यांना या भागाचा मोठा अनुभव आहे. ते ६ महिन्यात निवृत्त होनार आहेत. त्याच्या आत कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना त्यांच्याकडून संपूर्ण परिसराची माहिती घेऊन प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी असूनदेखील या भागातील नागरिक तहानलेलेच राहतील यात शंका नाही.

Jalakumbh which has been waiting for water for 12 years in Dnyaneshwarnagar area. In the second photograph, the work of the Jalakumbha which has come up on Pragatipatha at some distance in the same area
Nashik News : अंशकालीन स्त्री परिचरांचा 1 ऑक्टोबरला जेलभरो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.