Nashik News : विभागातील सावरकर नगर येथील उद्यानाचे ऑंखो देखा हाल बघितल्यावर महापालिकेची उद्याने टवळखोरांचा अड्डा बनवण्यात मदतच करतात की काय, असा संशय येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विभागातील सावरकर नगर येथील उद्यानात अस्वच्छतेमुळे कचऱ्याचे ढीग झाले असून त्यात धुळखात पडलेल्या लाखो रुपयांच्या ग्रीन जिमचे साहित्याची हकिगत बघितल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून या उद्यानात झाडूसुद्धा मारला नसेल याचा अंदाज येतो. (Nashik Due to negligence of Municipal Corporation garbage piled up in Green Gym Park at Savarkar Nagar)
उद्यानात टवाळखोरांचा हैदोस यामुळे परिसरातील आरोग्यासह इतर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याबाबत उद्यान विभागाचे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर साफसफाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा परिसरातील नागरिकांसह शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नाशिकच्या प्रभाग क्रमांक दहामधील सावरकर नगर येथील नाशिक महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडामध्ये बांधकाम विभागाच्या वतीने ग्रीन जिम बसवले आहे. मात्र ग्रीन जिम जेथे बसवण्यात आली आहे, त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची साफसफाईही करण्यात आलेली नाही. (latest marathi news)
महानगरपालिकेच्या ओपन स्पेसचा वापर काही लोक आपल्या वैयक्तिक कामांसाठीही करत असल्याचे पाहणीत उघडकीस आले आहे. या ठिकाणी सिमेंटचे पत्रे दारूच्या बाटल्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला. दरम्यान या संदर्भात नागरिकांसह शिवसेनेतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
"महापालिका प्रशासन लाखो रुपये विकास कामाच्या नावावर खर्च करते. पण प्रत्यक्षात मात्र मेन्टनस करताना दिसत नाही. उद्यान विभागाचा कारभार तर वेगळाच आहे. मेन्टनस न करताच बिल काढले जात आहेत. त्यामुळे या उद्यानाची लवकर स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन करू."- देवा जाधव, महानगर संघटक, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.