सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून चांगल्या प्रकारे वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या म्हाळुंगी नदीचे पाणी भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे. मंगळवार व बुधवार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे डोंगरदऱ्यातील सर्वच बंधारे व नद्या भरल्यामुळे सदरचे पाणी आता भोजापुर धरणाकडे प्रवाहित होत आहे. (rains in western side Mahalungi river water increase to large extent)
दोन ते अडीच महिन्यापासून भोजापुर धरणात फक्त मृत साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे यावरती अवलंबून असलेल्या पाच गाव सोळा गाव पाणीपुरवठा योजना शेवटच्या टप्प्यात येऊन थांबल्या होत्या मात्र आता सुरू झालेल्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून अशाच प्रकारे पश्चिम पट्ट्यांमध्ये पाऊस सुरू राहिल्यास आठ ते दहा दिवसांमध्ये भोजापुर धरण उसळून वाहील असा अंदाज आहे. (latest marathi news)
शेतकरी वर्गामध्ये पूर्णता नाराजीचे सूर उमटले होते पण बुधवारी रात्री भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून या परिसरामधील शेतकरी वर्ग पूर्ण नाराज झाला होता कारण या भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आज सकाळी मोठ्या प्रमाणावरती भोजापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
या भागामध्ये यावर्षी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन सारखे पीक घेतलेले असून ती वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता तीन ते चार दिवसापासून थोड्या कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचा वातावरण आहे. भोजापुर धरणामध्ये येणारे पाणी त्यामुळे आता शेतकरी वर्गांना वरदान ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.