Nashik News : उन्हाळी सुट्यांनी आता सर्वत्र बसस्थानके गजबजू लागली आहेत. इतर बसस्थानकांप्रमाणेच मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु ऐन हंगामात स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने प्रवाशांसह राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये चांगली आसनव्यवस्थाही नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. (passengers as well as employees of Corporation are also suffering )
तर पत्र्याच्या नियंत्रण कक्षातून कामकाज करताना कर्मचाऱ्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी) महामार्ग बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत असलेल्या फलाटासह प्रतीक्षालयाचा परिसर, तिकीटघर पत्रे ठोकून वापरासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानकाच्या आवारात शेड टाकून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र सध्या उन्हाळी सुट्यांमुळे मोठ्या संख्येने प्रवासी पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे सामान्य दिवसांच्या तुलनेत सध्या बसस्थानकांवर होणाऱ्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच महामार्ग बसस्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या दृष्टीने बसस्थानकाचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. परंतु नूतनीकरणाचा कालावधी चुकल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.(Latest Marathi News)
अपुऱ्या आसन व्यवस्थेने गैरसोय
तात्पुरत्या शेडमध्ये अत्यंत तुरळक प्रमाणात आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील प्रवाशांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. काहीवेळा तर एक ते दीड तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याने दीर्घकाळ उभे राहणाऱ्या प्रवाशांना मनःस्ताप होत आहे.
उकाड्यामुळे प्रवासी घामाघूम
दिवसा तप्त उन्हामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडचे पत्रे तापत असल्याने आडोशाला उभ्या असलेल्या प्रवाशांना अधिक प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे घामाघूम झालेले प्रवासी बसमध्ये आसन मिळविल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.