MSEB News : शहरात नागरिककरण झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रोजगाराची उपलब्धता, नोकरदारांसाठी मध्यवर्ती केंद्र ही पिंपळगावची खासियत आहे. त्यात महत्त्वाची भूमिका निभावते ते पिंपळगाव शहरात असलेला मुबलक पाणीपुरवठा, पण सध्याचे हेच पाणी दोन दिवसांपासून पेटले आहे. ( nashik MSEB News marathi news)
कारण सव्वादोन कोटी रुपयांच्या थकित वीजबिलावरून ‘महावितरण’ने पिंपळगावची तहान भागविणाऱ्या पालखेड धरणावरील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अन् राजकारणही पेटले आहे. राजकीय सुंदोपसुंदी अन् ‘महावितरण’च्या ताठर भूमिकेमुळे पिंपळगावकरांच्या घशाला उन्हाळ्यात कोरड पडायला नको, एवढी माफक इच्छा सर्वसामान्यांची आहे.
‘महावितरण’ने अगदीच शॉक ट्रिंटमेंट न देता सामंजस्याची भूमिका स्वीकारून थकीत रक्कम टप्प्याटप्याने वसुली करायला हवी. पिंपळगावच्या विकासाचे शिल्पकार (कै.) नामदेवराव बनकर यांच्या दूरदृष्टीने शहराची तहान भागविण्यासाठी १९८० मध्ये पालखेड धरणातून पाणीपुरवठा योजना राबविली.
आमदार दिलीप बनकर यांनी २००७ मध्ये वाढीव पाणीपुरवठा योजना आणून शहराला ओलेचिंब केले. जलजीवन मिशन अंतर्गत ३६ कोटींच्या योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पाणीपुरवठा योजनेमुळे उन्हाळ्यातही पिंपळगाव शहराला कधीही पाण्याची चणचण भासली नाही.
कृत्रिम पाणीटंचाईची भिती
उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट पिंपळगाव शहरावर घोंगावत आहे. कारण धरणातील पाणीपातळीत घट होत आहे. सध्या ‘महावितरण’ने सव्वादोन कोटी रुपयांचे वीजबिल थकल्यावरून वीजपुरवठा खंडित करून शाॅक दिला आहे. तडकाफडकी झालेल्या या कारवाईने सरपंच भास्करराव बनकर यांच्या पुढे अनपेक्षित संकट ठाकले आहे.
सध्या जनरेटरच्या सहाय्याने पाणी उपसा करून पिंपळगावकरांची तृष्णा भागविली जात आहे. मात्र, जनरेटरसाठी रोज लागणारे २०० लिटर डिझेलची किंमत २० हजारांदरम्यान आहे. वीजबिलाच्या तुलनेत रोज दुप्पटीने हा खर्च होत आहे. जो ग्रामपंचायत प्रशासनाला परवडणारा नाही. त्याचा परिणाम अंशत: पाणीकपात सुरू केली आहे.
सुमारे पाच कोटी रुपये घर व पाणीपट्टी थकीत असल्याने सरपंच बनकर यांची मासिक खर्च व विकासकामे करताना मोठी कसरत होत आहे. दरम्यान, थकित वीजबिल मागील सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत असल्यावरून सरपंच बनकर व त्यांचे विरोधक सतीश मोरे, गणेश बनकर यांच्यात राजकारण पेटले आहे.
पेटलेल्या पाण्याला राजकीय रंग मिळत आहे. सुंदोपसुंदीपेक्षा सर्व गटांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांची मनधरणी करायला हवी. थकीत वीज देयक टप्प्याटप्प्याने वसूल करण्याची समजुतीची भूमिका ‘महावितरण’ने घ्यावी. तसे न झाल्यास पिंपळगावकरांना उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.