Microsoft Update Issue : नाशिकमध्ये ‘तिकीटिंग’ची बोंब, बँकिंग सुरक्षित; मायक्रोसॉफ्ट यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका

Nashik News : मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनच्या क्लाऊड सेवेतील ३६५ सेवांमध्ये बिघाड झाल्याने जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचे परिणाम दिसून आले.
Microsoft Update Issue
Microsoft Update Issueesakal
Updated on

Nashik News : मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनच्या क्लाऊड सेवेतील ३६५ सेवांमध्ये बिघाड झाल्याने जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचे परिणाम दिसून आले. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर येथे ऑनलाइन सेवांवर परिणाम दिसून आला. नाशिकमध्ये मात्र नाशिक- नागपूर विमानसेवा वगळता फारसा परिणाम दिसून आला नही. (Nashik ticketing system of airline was affected)

तिकिटिंग, विशेषतः विमानसेवेची तिकीट यंत्रणा प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले. बँकिंग क्षेत्राला फटका बसला नसल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. मायक्रोसॉफ्टतर्फे आपले सॉफ्टवेअर उपलब्ध करून देताना त्याची पूर्वचाचणी करण्यात आली नसल्याने या स्वरूपाची तांत्रिक अडचण उद्भवल्याची माहिती नाशिकमधील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर सॉफ्टवेअर पुन्हा माघारी घेताना राबविलेल्या प्रक्रियेमुळे अनेक वापरकर्त्यांना त्याचा फटका बसला. जगभरात विविध क्षेत्रातील कामकाज शुक्रवारी (ता. १९) प्रभावित झाले. महाराष्ट्रात विस्कळित सेवेचा मुंबईत अधिक परिणाम दिसून आला. त्याखालोखाल पुणे, नागपूरमध्ये काहीसा परिणाम झाला.

नाशिकमध्ये मात्र नाशिकसह सभोवतालच्या परिसरात या तांत्रिक समस्येमुळे फार काही परिणाम झाला नाही. मात्र नाशिकवरून सुरू असलेली विमानसेवा प्रभावित झाली होती. तसेच मायक्रोसॉफ्ट यंत्रणेशी संलग्न असलेल्या क्षेत्रांनादेखील या तांत्रिक बिघाडाचा फटका सहन करावा लागला आहे. मायक्रोसॉफ्ट यंत्रणेशी संलग्न असलेल्या यंत्रणा बंद ठेवण्यात आल्या. (latest marathi news)

Microsoft Update Issue
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

नागपूरला अडचण

नाशिकच्या ओझर विमानतळावरून अहमदाबाद, दिल्ली व हैदराबाद या शहरांसाठी नियमित सेवा सुरु राहीली. ओझर विमानतळावरून नियोजित वेळेनुसार विमान झेपावले. परंतु शुक्रवारी नियोजित नागपूरसाठी फ्लाइट मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले. इंडिगोच्या सर्वच सेवांवर परिणाम दिसून आला. नाशिक मध्ये मात्र सर्व व्यवहार सुरळीत राहिले.

"मायक्रोसॉफ्टच्या समस्येचा नाशिकमधील बँकिंग, एनबीएफसी किंवा प्रशासकीय कार्यालयांवर परिणाम झालेला नाही. मात्र विमानसेवा तिकीट यंत्रणा व इतर तिकीट सेवेच्या क्षेत्रांना फटका बसला आहे. नाशिकमधील इतर उद्योगांवर फारसा परिणाम झाला नाही." - पीयूष सोमाणी, एमडी, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन.

Microsoft Update Issue
Nashik ZP News : नव्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरसाठी फेरप्रस्ताव सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com