Nashik News : दिवाळीत मालेगाव शहर लखलखणार; परिसरात 20 हजार एलईडी पथदीप लागणार

Nashik News : कॅम्प, संगमेश्‍वर, जुना आग्रा महामार्ग, सटाणा नाका, रावळगाव नाका यासह विविध भागात ३१ हजार पथदीप आहेत.
LED Street Light
LED Street Lightesakal
Updated on

मालेगाव : येथे कॅम्प, संगमेश्‍वर, जुना आग्रा महामार्ग, सटाणा नाका, रावळगाव नाका यासह विविध भागात ३१ हजार पथदीप आहेत. यात २० हजार ७०० पथदीप हे सोडियमचे आहेत. सोडिअम पथदिपांच्या जागी पूर्ण एलईडी पथदीप लावण्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे मालेगाव शहर पथदिपांनी उजळून निघणार आहे. येथील महापालिकेच्या हद्दीत ३१ हजार पथदीप आहेत. (During Diwali 20 thousand LED street lamps will be installed in Malegaon city )

यात १० हजार ३०० पथदीप एलईडी बसविण्यात आले आहेत. येथे असलेले सोडियम पथदीप ७०, १५०, २५० वॅटचे आहेत. तर तेच एलईडी पथदीप ७० वॅटचे असून त्याचा प्रकाश सोडियमपेक्षाही जास्त असल्याने त्यामुळे रस्ते चकचकीत दिसत आहेत. २०१८ पासून ते आजपर्यंत महापालिका हद्दीत १० हजार ३०० पथदीप बसविले आहेत. यात २० हजार ७०० पथदीप एलईडी व्हावेत यासाठी महापालिकेतर्फे दोन कोटीची निविदा मागविली आहे.

तातडीने यावर देखील काम सुरु होणार आहे. शहरात संपूर्ण एलईडी बसविल्यास महापालिकेच्या वीज बिलात ५० टक्के बचत होणार आहे. महापालिकेला ६० ते ७५ लाखापर्यंत दरमहा वीज बिल येते.त्यात ५० टक्के बचत होईल. शहरात दहा हजार ३०० पथदीप ईएसएल या एलईडी कंपनीतर्फे ७० वॅटचे लावण्यात आले आहेत. तसेच शहरात मोसमपुल ते गिरणा पुलापर्यंत, सटाणा नाका ते टेहरे चौफुलीपर्यंत, मोसम पूल ते रावळगाव नाका, एकात्मता चौक ते कॉलेज स्टॉपपर्यंत यासह अनेक भागात रस्त्यावर ३२५ नवीन एलईडी पथदीप बसविले आहेत. (latest marathi news)

LED Street Light
Nashik News : खड्ड्यांवरून गंगापूर रोडचे रहिवासी एकवटले! महापालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध

या बसविलेल्या पथदिपांमुळे शहरात रस्ते चकचकीत झाले आहेत.यात सर्वात जादा प्रभाग एक मध्ये १० हजार ३२७ पथदिप असुन यात ८ हजार हे सोडियमचे पथदीप आहे. नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंत अनेक पथदीप बंद आहेत. तसेच काही भागात देखील अजून पथदीपांची प्रतिक्षा आहे. महापालिकेने या भागांचा सर्वे करून येथे पथदीप लावावे. अशी मागणी आहे.

''येथे सर्व पथदिपे एलईडी व्हावी यासाठी दोन कोटीची निविदा काढली आहे. आगामी काळात शहरात पूर्णपणे सोडिअमचे पथदीप काढून एलईडी पथदीप बसविले जातील. त्यामुळे महापालिकेला पथदीपांच्या बिलात ५० टक्के घट होईल. आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाने काम सुरु आहे.''- अभिजित पवार, विद्युत अधिक्षक, महापालिका

LED Street Light
Nashik News : भोसला गटाचे दिमाखदार बाल पथसंचलन; कॉलेज रोडवर रांगोळ्या, फुलांची उधळण करीत स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.