E-Panchnama App : गारपीट, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अचूक नोंदवून त्यानुसार योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी उपयोगी ‘ई-पंचनामा’ हे अॅप तयार करण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर या ॲपचा आता नाशिक विभागात लवकरच वापर सुरू होणार आहे. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ‘ई-पंचनामा’ ॲपविषयी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. यात नाशिकच्या अधिकाऱ्यांना काही सूचनाही देण्यात आल्या. (E Panchnama for farmers compensation )