Nashik News : रेशन दुकानदारांकडून ई- पॉज मशिन जमा! वारंवार येणाऱ्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी

Nashik News : सर्व्हरचा दोष त्वरित दूर करावा किंवा वेळेची मर्यादा रद्द करावी अशी मागणी करीत संतप्त दुकानदारांनी धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांच्याकडे यंत्र जमा करण्याचा प्रयत्न केला.
District President Mahesh Sadavarte, State President Salim Patel etc. while depositing e-Podge machine.
District President Mahesh Sadavarte, State President Salim Patel etc. while depositing e-Podge machine.esakal
Updated on

Nashik News : रेशन धान्य वितरण दुकानदारांना देण्यात आलेल्या यंत्रामध्ये दोष निर्माण होत असून त्यामुळे दुकानदारांचे आणि ग्राहकांचे वाद होऊ लागले आहे. सर्व्हरचा दोष त्वरित दूर करावा किंवा वेळेची मर्यादा रद्द करावी अशी मागणी करीत संतप्त दुकानदारांनी धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांच्याकडे यंत्र जमा करण्याचा प्रयत्न केला. (Nashik E pause machine collected from ration shopkeepers)

दुकानदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, यंत्रांना येणारा नेटवर्क प्रॉब्लेम हा गर्दी असताना येतोच आणि या महिन्यात तर १५ दिवस मशिन बंदच आहेत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. ऑक्टोबर २०२३ पासून आजपर्यंत केलेल्या केवायसी व कार्डधारकांचे आयुष्यमान कार्ड काढून दिलेल्या कोणतेही कमिशन आजपर्यंत मिळाले नाही.

जोपर्यंत कमिशन मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला पुन्हा उर्वरित केवायसी व आयुष्यमान कार्ड काढण्याची सक्ती करू नये. धान्य पोच ही दुकानदाराला वेळेत होतं नाही आणि महिनाअखेर धान्य प्राप्त होते. त्यामुळे कार्डधारक हा धान्यापासून वंचित राहतो व दुकानदार हा कमिशनपासून वंचित रहातो. (latest marathi news)

District President Mahesh Sadavarte, State President Salim Patel etc. while depositing e-Podge machine.
Nashik Dam Water Storage : नाशिक धरण समूहाचा साठा 41.96 टक्क्यांवर!

त्यामुळे जोपर्यंत दुकानदाराला पुढच्या महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळत नाही, तोपर्यंत कॅरी फॉरवर्डची सुविधा देण्याबरोबरच दुकानदारांना कमिशन वाढवून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. ऑनलाइन शिधापत्रिकेतील नाव कमी करणे किंवा वाढवणे तसेच पत्ता बदल करणे व मशिन मध्येच ऑनलाइन कार्ड करण्याची सुविधा ई- पॉज मशिनमध्ये उपलब्ध करून देण्यात यावी.

यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना दुकानदारांनी काही काळ मशिनही काही काळ कार्यालयात जमा केले होते. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश सदावर्ते, सलीम पटेल, दिलीप तुपे, रतन काळे, रमेश जाधव, कमलेश कांकरिया, दीपक चव्हाण, अमित नगरकर, उमेश वैद्य, मंगेश पवार, अनिकेत झिटे, गौरी आहेर, अजय कंसारा, दिलीप मोरे, खंडेराव पाटील, विलास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

District President Mahesh Sadavarte, State President Salim Patel etc. while depositing e-Podge machine.
Jalgaon Sand News : 9 कोटींचा दंड वसुलीची नोंद दिसेना; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.