E-Peek Pahani : आजपासून खरिप पिकांची नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी! जिल्ह्यात सुमारे 7 लाख हेक्टरवर होणार पीक पाहणी

Nashik News : माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा...या उद्दिष्ट्याने उद्या (ता.१) पासून पीक पाहणी सुरू होत आहे.
E-Peek Pahani
E-Peek Pahani esakal
Updated on

Nashik News : माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा...या उद्दिष्ट्याने उद्या (ता.१) पासून पीक पाहणी सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या पिकांची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करायची असून या पिकांची नोंद सातबारावर होणार आहे. पिक विमा,पीक कर्ज,हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकाची नोंद अत्यावश्यक असल्याने नोंद अनिवार्य आहे. (E-Peek Pahani)

एक ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे शेतात जाउन पिकांची नोंद करायची आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार तलाठी उताऱ्यावर पिकांची नोंद व्हायची. मात्र पारदर्शीपणा येण्यासाठी तीन वर्षापासून ऑनलाईन पीक नोंदणी सुरू झाली आहे. मागील पाहणी केलेल्या ६३ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झाला आहे.

यावर्षी जिल्ह्यात पाच लाख ६९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असली तरी ६ लाख ४१ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. याशिवाय कांद्याखाली क्षेत्र गुंतवले जाते, त्यामुळे सुमारे ७ लाख हेक्टरवरील पीक पाहणी जिल्ह्यात होणार आहे.

पंचेचाळीस दिवस पाहणी

ई-पीक पाहणी १ ऑगस्टपासून ४५ दिवस सुरू राहील. १५ सप्टेंबरला ई-पीक पाहणी समाप्त होईल. मुदतवाढ न मिळाल्यास १६ सप्टेंबर पासून तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. तलाठी पातळीवरील पाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवतील. (latest marathi news)

E-Peek Pahani
Nashik Police : सरकारी पाट्या लावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा! शहर पोलिसांकडून पावणे दोनशे वाहनांवर दंडात्मक कारवाई

स्मार्ट मोबाइलद्वारे गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी (डीसीएस) ॲप डाऊनलोड करता येते. एकाच महसुली गावात एकापेक्षा अधिक खाते क्रमांक असल्यास सर्व भूमापन गट क्रमांक मोबाईल स्क्रीनवर नोंदणीसाठी उपलब्ध करून दिले जातात. ही नोंदणी शेतात उभे राहून करायची आहे.

●यंदापासून डिजिटल क्रॉप सर्व्हे

या वर्षीच्या खरीपापासून केंद्राने डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) पद्धत सुरु केली आहे.तसेच राज्य शासनानेही ई-पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धत स्वतंत्रपणे राबवित आहे. अर्थात दोन्ही पद्धतीच्या ई-पीक पाहणीसाठी वापरले जाणारे अप एकच आहे.सर्व तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीनुसार ई-पीक पाहणी होणार आहे.

अशी करता नोंद

- गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी

- विभाग निवडून मोबाईल नंबर टाकावा.

- विभाग, जिल्हा, तालुका, गावाची निवड

- विचारलेली माहिती भरून क्लिक करावे.

- खातेदाराची निवड करीत खाते निवडावे

- पीक पेरणी भरुन पिकाची निवड करा

- पिकाचे फोटो अपलोड करावेत

E-Peek Pahani
Nashik News : बचतगटाच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ; ‘उद्योगिनीमार्ट’ पोर्टलचे अनावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.