Child Care : सांगा कसं जगायचं, कण्हत, कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा..! सध्या मुलांचे आयुष्य कवितेच्या या ओळीप्रमाणे सुरू आहे. गुरुवारी शाळकरी मुलीला सिगारेट ओढताना बघून शिक्षकाने हटकल्यावर मुलीने घाबरून कोणताही विचार न करता शाळेच्या गच्चीवरून उडी मारली.
यामध्ये मुलगी जखमी झाली पण, हातातल्या मोबाईलमध्ये जगाची माहिती कळते पण, मुलांच्या विश्वात काय सुरू आहे याची पुसटशी कल्पना येत नाही. हेच निदर्शनास आले. (nashik Edge of Communication Needed in Understanding Children World marathi news)
शाळेपासून २०० मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा असताना मुलीकडे सिगारेट आली कशी, हा प्रश्न आहे. तरुणपणात प्रवेश करताना शारीरिक बदल दिसून येतात पण, मानसिक बदल दिसून येत नाही.
शरीरातील हार्मोन्स बदलताना नवीन प्रयोग करून बघावे, इतर मित्र जे करतात तसे करून बघावे, मित्रांचा आग्रह, नाही केले तर मित्र काय म्हणतील, नाव ठेवतील, कमीपणा वाटतो म्हणून आततायी कृत्य मुलांच्या हातून नकळत घडते. पोर्न बघणे, सिगारेट ट्राय करून बघणे हादेखील त्याचाच भाग.
आपण काय करतोय, त्याचे परिणाम काय होतील याचे भान मुलांना राहत नाही. मनात असंख्य प्रश्न असतात पण त्या प्रश्नांचे उत्तर कुणाकडूनही मिळत नाही आणि मूल स्वतःच्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तर मिळवितात. वास्तविक या वयातच मुलांकडून अनेक चुका होतात. या वयात समजून घेऊन, समजावून सांगून, सुधारण्याची संधी देणे महत्त्वाचे.
पालकांच्या नजरेतून
वाढत्या महागाईमुळे मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी, घरखर्च भागवण्यासाठी आईवडील दोन्ही नोकरी करतात. एकदा सकाळी बाहेर पडल्यानंतर पालक संध्याकाळी घरी येतात. त्यात घरातली कामे, इतर जबाबदाऱ्यांमुळे पालकांचे मुलांकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत जाते. मूल नेमके काय विचार करतात याचा पालकांना थांगपत्ता नसतो. जेव्हा अशी काही घटना पडते तेव्हा पालकही बुचकळ्यात पडतात.
मुलांच्या नजरेतून
आईवडील घरात सतत भांडण करत असतील तर मुलांच्या मनात भीती निर्माण होते. आईवडील दोन्ही नोकरी करतात पण एकमेकांचा आदर करत नसतील तर मूल तसे घडत जाते. घरात स्त्री- पुरुष समानता नसेल तर मुलांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. संवादाच्या अभावाने मूल एकलकोंडी, स्वमग्न होतात आणि चुकांचे रूपांतर गुन्ह्यात होते.
"कोणतीही अडचण ही तात्पुरती असते, त्यावर मात करता येते मुलांना शिकविणे गरजेचे आहे. जिथे धाक जास्त तिथे मनाचे दार बंद होतात आणि बिघडण्याचे प्रमाण जास्त असते. शाळा आणि शिक्षक मुलांना सुधारण्याचे काम करतात. मानसिक आरोग्य, व्यसन मुक्तता, आत्महत्या प्रतिबंध यावर शाळेत कार्यक्रम राबविले पाहिजे. मुलांनी सिगारेट घेतली तर काही होत नाही. मुलगी आहे सर्वांना समजेल या भितीपोटी मुलीने घाबरून असे कृत्य केले असेल."
-सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक
"अचानक चूक पकडल्यानंतर लाज वाटणे, अपराधीपणाची भावना, समाजात तोंड कसे दाखवणार, असा प्रश्न निर्माण होऊन भविष्य अंधारात दिसायला लागते. यामुळे आता आपण आपले जीवन संपवावे हाच विचार पटकन मनात येतो मेंदूचा पुढील भाग prefrontalcortex तेवढा प्रगल्भ नसल्याने सारासार विचार न करता हातून पटकन कृत्य घडते."
- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.