Nashik News : आदिवासी भागात मोहाच्या तेलाची क्रेझ! बियांपासून तेल करण्याचा पारंपरिक प्रकाराला पसंती

Nashik News : आदिवासी भागात आजही पारंपरिक आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या मोहाच्या बियांपासून तयार होणाऱ्या खाद्यतेलाला पसंती आहे.
oil
oil esakal
Updated on

घोटी : बाजारात देशी विदेशी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अनेक उत्पादन सहज उपलब्ध होत असताना आदिवासी भागात मात्र आजही पारंपरिक आदिवासींचा कल्पवृक्ष म्हटल्या जाणाऱ्या मोहाच्या बियांपासून तयार होणाऱ्या खाद्यतेलाला पसंती आहे. आरोग्यासाठी गुणकारी म्हणून आजही मोहाच्या तेलाची वाड्यापाड्यावर महत्त्व दिले जाते. (Edible oil prepared from traditional moha seeds is preferred in tribal areas)

परिणामी, तेल काढण्यासाठी कारेगाव,घोटी घाण्यातून काढण्यासाठी किलोस १५ रुपये घेतात.बिया विक्रीस २० ते ३० रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहे. फुलांचा बहर ओसरल्यावर जून-जुलै दरम्यान परिपक्व बीया फोडून उन्हामध्ये वाळवून सुखावतात. घाण्यात बियांचे तेल काढून घरात खाद्यतेल म्हणून आदिवासी बांधव मोठ्याप्रमाणात वापर करतात.

आदिवासींच्या घरी व लग्नसोहळ्यात जेवणासाठी या तेलाला पसंती दिली जाते. घाण्यामधून तेल काढल्यावर त्यात कडवटपणा राहतो, तो कमी करण्यासाठी नागलीचे पाने टाकून उकळून ते थंड करून साठवतात.

आदिवासी पट्यात पसंती

पालघर, ठाणे, नाशिक, अकोले, जव्हारसह अनेक ठिकाणी आदिवासी खाद्यतेल म्हणून आजही मोहाच्या तेलाचा वापर होतो. चिंचले खैरे ( ता. इगतपुरी ) येथील श्रावण भगत हे वयवृद्ध सांगतात की,आम्ही बाजारात मिळणारे तेल वापरत नाही, भेसळयुक्त आणि आजारांना निमंत्रण देणाऱ्या बाजारातील तेलापेक्षा पारंपारीक तेल वापरत असल्याचे ७६ वर्षीय भगत यांनी सांगितले. (latest marathi news)

oil
Nashik Police Station : शहरातील वर्दळीतल्या ‘पोलिस चौक्या’ नावालाच! बंद चौक्यामुळे तक्रारदारांची गैरसोय

तेलाचा कांजण्या, गोवर, फोड, चर्म रोग, डोकेदुखी, सांधेदुखी अशा आजारावर या तेलाचा वापर होतो. मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व घर व परिसरातील उपद्रवी किडे-कीटक पळतात. असेही सांगितले.

रासायनिक गुणधर्म..

क्रूड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केल्याने पिकांना लागणारी पोषक द्रव्ये देखील भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातो.

"'मोह' च्या तेलामध्ये मोठ्याप्रमाणात ए’इ’बी-१,बी-६ यांसह हायप्रोटीन पोषक घटक असतात. त्यामुळे आदिवासींची जीवनशैली पाहताना अधिक वयोमान, नेत्र व हृदय ठणठणीत राहते.याला तेल हेही एक कारण आहे."– डॉ.कविता उपाध्ये ( आयुर्वेद तज्ज्ञ,घोटी )

oil
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.