नाशिक : शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, रेशनकार्ड व तलाठ्यांकडून मिळणाऱ्या सातबारा उताऱ्याचे काम थांबले आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे अर्ज सादर करण्याची अडचण झाली असून, तलाठीही निवडणूक कामात गुंतल्याने त्यांच्याकडील नोंदी, सातबाराची कामे प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (ता. १८) थांबणार आहे, तर बुधवारी (ता. २०) मतदान होईल. (Education certificates ration cards Satbara work stopped election code of conduct )